शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना सीव्हीसीची नियुक्ती नको- सुप्रीम कोर्ट सरकारला बजावले : निवड प्रक्रियेसंबंधी तपशील मागितला

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि दक्षता आयुक्तांची नियुक्ती परवानगीविना करू नये असे बजावतानाच सवार्ेच्च न्यायालयाने या पदांच्या निवडीसंबंधी सर्व तपशील सरकारकडून मागवला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि दक्षता आयुक्तांची नियुक्ती परवानगीविना करू नये असे बजावतानाच सवार्ेच्च न्यायालयाने या पदांच्या निवडीसंबंधी सर्व तपशील सरकारकडून मागवला आहे.
सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. मदन बी. लोकूर यांच्या खंडपीठाने हा आदेश देताना सध्याची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याची सरकारला मुभा दिली. आम्ही निवड प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती सीलबंद पाकिटात देणार असल्याचे अटर्नी जन. मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडताना म्हटले. सेंटर फॉर इंटिग्रिटी या स्वयंसेवी संस्थेने या नियुक्तीला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल केली आहे. तत्कालीन केंद्रीय दक्षता आयुक्त प्रदीप कुमार आणि दक्षता आयुक्त जे.एम. गर्ग यांच्या निवृत्तीनंतर सरकारने रिक्त जागा भरण्यासाठी कोणत्याही जाहिराती दिलेल्या नसतानाही सरकार ही नियुक्ती प्रक्रिया पुढे सुरू ठेवत असल्याचा आरोप या जनहित याचिकेत केलेला होता. कुमार आणि गर्ग यांनी आपली कार्यकाळ अनुक्रमे २८ आणि ७ सप्टेंबर रोजी पूर्ण केला होता.
-----------------------
यापूर्वीही ओढले ताशेरे...
यापूर्वी १८ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी सवार्ेच्च न्यायालयाने या दोन पदांच्या नियुक्तीबाबत पारदर्शकतेचा अभाव असल्याचे सांगत सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर सरकारने नियुक्तीबाबत अंतिम निर्णय न्यायालयाच्या परवानगीविना घेतला जाणार नसल्याची ग्वाही दिली होती.