शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

योगी सरकार बरखास्त करा, ‘हाथरस’वर भाजप गप्प का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 6:18 AM

काँग्रेसची जोरदार निदर्शने; राज्यभर ठिकठिकाणी पडसाद, विविध संघटनांकडून निषेध

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले. प्रदेश काँग्रेसने मुंबईत निदर्शने करून योगी आदित्यनाथ यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रस्त्यात अडवून उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर निदर्शने के ली. छोट्या छोट्या गोष्टीत सतत टिवटिव करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता उत्तर प्रदेशच्या या घटनेवर मौन का बाळगले आहे? महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना ही दुर्दैवी घटना मान्य आहे का? मान्य नसेल तर त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध का केला नाही? अस सवालही काँग्रेस नेत्यांनी केला.पोलीस दल जातीत विभागलेमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागासवर्गीय मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. पोलिसच त्यांना जाळून टाकत आहेत. पोलीस दल जातीमध्ये विभागले गेले आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार तातडीने बरखास्त करावे.या आंदोलनात सार्वजनिक बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आ. झिशान सिद्दीकी, माजी मंत्री अनिस अहमद, बाबा सिद्दीकी, सरचिटणीस मोहन जोशी, सचिन सावंत, प्रदेश सचिव राजाराम देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ही भाजपची पद्धत पुन्हा एकदा पुढे आली आहे. हाथरसमधील पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी धक्काबुक्की करुन खाली पाडले. एका प्रमुख पक्षाच्या प्रमुखाला दिलेली ही वागणूक निंदनीय आहे.- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेसउत्तर प्रदेश सरकारने केलेली कृती अत्यंत धक्कादायक आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप मागणी करते. आता भाजपने आत्मचिंतन करावे, आणि राष्ट्रपती राजवटीची गरज उत्तर प्रदेशात जास्त आहे हे तपासून पाहावे.- खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसदलित, पीडित, शोषितसमाजातील मुलीवर अन्याय होतो. तिचा आक्रोश देशात पोहोचू नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने दडपशाही केली आहे. एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळणे महत्त्वाचेआहे. ती सेलिब्रिटी नव्हती म्हणूनतिला न्याय नाकारण्याचा अधिकार रामाच्या नावाने राज्य करणाऱ्यांनानाही.- खा. संजय राऊत, खासदार शिवसेनाउत्तर प्रदेशातीलहाथरस येथील अत्याचाराची घटना पाशवी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. एरवी महाराष्टÑात थोडं कुठं काय झालं की आरडाओरडकरणारे, जाब विचारणारेआत्ता गप्प का आहेत?- राज ठाकरे, मनसे प्रमुख

टॅग्स :congressकाँग्रेसRapeबलात्कारPoliceपोलिस