डिजिटल इंडिया : मोबाइल अ‍ॅपवरून होणार 2021 ची जनगणना 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 01:54 PM2019-09-23T13:54:09+5:302019-09-23T14:35:39+5:30

देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते.

Digital India: 2021 census of the country to be made from mobile app | डिजिटल इंडिया : मोबाइल अ‍ॅपवरून होणार 2021 ची जनगणना 

डिजिटल इंडिया : मोबाइल अ‍ॅपवरून होणार 2021 ची जनगणना 

Next

नवी दिल्ली -  देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. सरकारचे आर्थिक धोरण, विविध कल्याणकारी योजनांचे नियोजन यांच्या दृष्टीने जनगणना महत्त्वपूर्ण ठरते. दरम्यान आपल्या देशाची 16 वी जनगणना 2021 मध्ये  होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अ‍ॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही माहिती दिली.
 
अमित शहा यांच्याहस्ते आज दिल्लीत जनगणना भवनाची पायाभरणी झाली. त्यावेळी 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेबाबतची माहिती अमित शहा यांनी दिली. ते म्हणाले की, ''2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेसाठी मोबाइल अ‍ॅपचा वापर होणार आहे. यामध्ये सर्व आकडेवारी डिजिटल पद्धतीने उपलब्ध होणार आहे. जेवढ्या सुक्ष्म पद्धतीने जनगणना होईल. तेवढीच देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी मदत मिळणार आहे.'' 



शहा पुढे म्हणाले की, जनगणना देशाच्या भविष्यातील विकासाच्या योजना बनवण्यासाठी आधार ठरत असते. त्यामुळे जनगणनेमध्ये लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 1865 नंतर देशात आतापर्यंत 16 वी जनगणना होणार आहे. आतापर्यंत जनगणेनेच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. आता जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे. 

Web Title: Digital India: 2021 census of the country to be made from mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.