शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी बोटीवरील वक्तव्यावरून डीआयजींचा माफीनामा

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या या बोटीत दहशतवादी होते आणि ही बोट भारतीत सागरी हद्दीत आल्यावर तिला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करून लोशाली यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले होते. परंतु ही बोट उडविण्याचे आदेश लोशाली किंवा अन्य कुणीही दिलेले नसून दहशतवाद्यांनीच पकडले जाण्याच्या भीतीने बोटीसह स्वत:ला उडविल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर लोशाली यांनी तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला एक पत्र लिहून आपल्या आचरणाबद्दल माफी मागितली आहे.
दरम्यान लोशाली यांनी मागितलेली माफी समाधानकारक नसल्याचे तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला आढळून आले आहे आणि याबाबत विस्तृत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने याआधीच लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)