शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

धूम-३ स्टाईल चोरी, एक बसायचा दुकानात, दुसरा करायचा चोऱ्या, जुळ्या भावांचा प्रताप, पोलीसही अवाक्, अखेरीस...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:48 IST

Uttar Pradesh Crime News: जुळ्या भावंडांना त्यांच्या चेहऱ्यातील साधर्म्यामुळे ओळखण्यात गडबड झाल्याने अनेक गमतीजमती घडतात. मात्र एकसारखं दिसण्याचा फायदा घेऊन दोन भावांनी मोठा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जुळ्या भावंडांना त्यांच्या चेहऱ्यातील साधर्म्यामुळे ओळखण्यात गडबड झाल्याने अनेक गमतीजमती घडतात. मात्र एकसारखं दिसण्याचा फायदा घेऊन दोन भावांनी मोठा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील फेज-१ पोलीस ठाण्यातील पोलिसांनी चोरांच्या एका टोळीचा पर्दाफाश करून ४ जणांना अटक केली आहे. या टोळीचे मास्टरमाईंड एकसारखे दिसणारे दोघे जुळे भाऊ असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पकडण्यात आलेल्या दोन्ही भावांचे चेहरे एकसारखे होते.  त्याचाच गैरफायदा घेऊन ते मोठ्या शिताफीने चोरीच्या घटना पूर्णत्वास न्यायचे. एवढंच नाही तर त्यांच्या चेहरेपट्टीतील साधर्म्यामुळे पोलीसही चकवा खायचे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या १५ दुचाकींसह वाहनांचे स्पेअर पार्ट्स मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या या मुद्देमालाची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीचं खास वैशिष्ट्य म्हणजे यातील मुख्य आरोपी असलेले अरमान उर्फ सुट्टा आणि उलमान हे जुळे भाऊ आहेत. दोघेही एकसारखे कपडे परिधान करून अदला-बदली करायचे. त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण व्हायचं . या दोघांपैकी एकजण कुणाला संशय येऊ नये म्हणून  दुकानात बसून राहायचा तर दुसरा धूम-३ स्टाईलमध्ये चोरी करायचा.

या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी सेक्टर-१४ए जवळून दोन जुळ्या भावांसह ४ आरोपींना अटक केली आहे. शादाब उर्फ रुतबा, अरमान उर्फ सुट्टा, उलमान आणि विजय अशी या चार आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ चोरलेल्या दुचाकी, १२ दुचाकींच्या टाक्या, ५ सायलेन्सर, ४ मडगार्ड आणि २ टायर रीम जप्त केले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Twin Brothers' 'Dhoom 3' Style Theft Baffles Police; Arrested

Web Summary : Twin brothers in Noida used their identical looks to commit thefts, with one acting as a decoy while the other stole. Police arrested them and two accomplices, recovering stolen bikes and parts worth ₹15 lakh.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश