भाड्याच्या जीपने लाटले परिवहनचे डिझेल फौजदारीची नोटीस: आयुक्त काळम-पाटील

By Admin | Updated: July 30, 2015 23:14 IST2015-07-30T23:14:06+5:302015-07-30T23:14:06+5:30

सोलापूर: आरोग्य खात्याच्या कामासाठी भाड्याने लावलेल्या जीपचालकाने एसएमटीच्या (महापालिका परिवहन) डेपोत ९२४ लिटर डिझेल भरून महापालिकेची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी चालक व ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे भरा अन्यथा फौजदारी करू अशी नोटीस बजावली आहे.

DeshGujarat Notice of Transportation by Transport Jeeps: Transport Commissioner Kalam-Patil | भाड्याच्या जीपने लाटले परिवहनचे डिझेल फौजदारीची नोटीस: आयुक्त काळम-पाटील

भाड्याच्या जीपने लाटले परिवहनचे डिझेल फौजदारीची नोटीस: आयुक्त काळम-पाटील

लापूर: आरोग्य खात्याच्या कामासाठी भाड्याने लावलेल्या जीपचालकाने एसएमटीच्या (महापालिका परिवहन) डेपोत ९२४ लिटर डिझेल भरून महापालिकेची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी चालक व ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे भरा अन्यथा फौजदारी करू अशी नोटीस बजावली आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्यांतर्गत असलेल्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या कामासाठी २0१४ मध्ये विनायक ट्रॅव्हल एजन्सीकडून टाटा सुमो भाड्याने घेण्यात आली होती. एजन्सीने या कामासाठी दोन वेगवेगळ्या गाड्या वापरल्या. चालकाने या दोन्ही गाड्यांमध्ये एप्रिल ते जुलै २0१४ या काळात चालकाने एसएमटीच्या डेपोत जाऊन डिझेल भरले व भाडे पूर्णत: वसूल केले. ही बाब आरोग्य सभापती राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली यांच्या निदर्शनाला आली. त्यांनी याबाबत आयुक्त काळम—पाटील यांच्याकडे तक्रार केली. चौकशीत ९२४ लिटर डिझेल परस्पर भरण्यात आल्याचे आढळले. त्यावर आयुक्त काळम-पाटील यांनी विनायक ट्रॅव्हल्स एजन्सीचे चालक बिभीषण मगर यांना तीन दिवसात इतक्या डिझेलचे पैसे महापालिकेत भरावेत अन्यथा फसवणुकीची फिर्याद दाखल केली जाईल अशी नोटीस बजावली आहे.

Web Title: DeshGujarat Notice of Transportation by Transport Jeeps: Transport Commissioner Kalam-Patil