शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत दिल्लीकरांवर आता डेंग्यूचे सावट; यंत्रणेवरील ताण वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 00:44 IST

नोव्हेंबरमध्ये २०० रुग्ण, राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे.

नवी दिल्ली : कोरोनापाठोपाठ दिल्लीकरांवरडेंग्यूचे संकट घोंघावू लागले आहे. नोव्हेंबर संपताना दिल्लीत दोनशेपेक्षा जास्त डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. या आठवड्यात ४९ तर त्याआधी ८० रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणांंवरही दबाव वाढला आहे. राज्य सरकार, तीनही महानगरपालिकांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. डासांपासून होणारा आजार रोखताना कोरोनाशीदेखील लढण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. दिल्ली महापालिकेच्या दाव्यानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये ९५० डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. 

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. दररोज सहा हजारांपेक्षाही जास्त रुग्ण आढळले. रोज शंभरपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होत होता. आता डेंग्यू रुग्णांची त्यात भर पडली.डेंग्यू रुग्ण वाढत असताना मलेरिया रुग्णांमध्ये घट दिसली. गेल्या आठवड्यात एका जणाला मलेरिया झाला होता. त्याआधी ऑक्टोबर महिन्यात मलेरियाचा रुग्ण आढळला नाही.

राज्य सरकारने डेंग्यू, मलेरिया रुग्णांची माहिती देण्यासाठी अंतर्गत डॅशबोर्ड तयार केला आहे. त्यावर रुग्णांची नोंद केली जाते. नवी दिल्ली, दिल्ली महानगरपालिकेकडून तशी माहिती पुरविली जाते. डेंग्यू, मलेरियाची चाचणी करण्यासाठी सुसज्ज यंत्रणा सर्वच सरकारी रुग्णालयांमध्ये असली तरी कोरोनामुळे त्यावरही मोठा ताण आहे. कोरोनाचा प्रसार रोखताना डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी महानगरपालिकांना केले आहे.

कचऱ्याच्या बदल्यात मास्कएनडीएमसी महापालिकेने अभिनव उपक्रम सुरू केला. ज्यात प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात मास्क मिळेल. मुख्य सचिव विजय देव यांच्या उपस्थितीत कनाॅट प्लेसमध्ये हे अभियान सुरू झाले. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे (यूनडीपी) त्यासाठी सहकार्य मिळाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यूdelhiदिल्ली