वीज तांत्रिक कामगारांची निदर्शने

By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:58+5:302015-09-11T21:24:58+5:30

सोलापूर : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीतील प्रलंबित प्रश्नावर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने बाळे येथील पारेषण मंडळ कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली़

Demonstrations of electricity technical workers | वीज तांत्रिक कामगारांची निदर्शने

वीज तांत्रिक कामगारांची निदर्शने

लापूर : महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीतील प्रलंबित प्रश्नावर विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने बाळे येथील पारेषण मंडळ कार्यालयासमोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली़
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष एस़ आऱ कोले यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने केली़ पुणे पारेषण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, परिमंडळ संघटक एस़ एस़अंबुरे, मंडल अध्यक्ष जी़ एम़ नगरे, मंडल सचिव व्ही़ आऱ लोणी आदी सहभागी झाले होते़ यावेळी पारेषण झोनचे गव्हाणे, एम़ जे़ अलाट, नितीन चव्हाण, विजय जगताप, यु़ डी़ घंटे, डी़ आऱ कदम, एस़ डी़ माळी, एस़ टी़ शिंदे, एच़ बी़ वाळके, सुरेश पाटील आदी उपस्थित होते़
काय आहेत मागण्या़़़
* सहायक यंत्रचालकाची रिक्त पदे अंतर्गत भरती सूचनेद्वारे भरावीत़
* तंत्रश्रेणी ४ मधील तांत्रिक कामगारांना तंत्रज्ञ श्रेणी ३ मध्ये अपग्रेड करा़
* श्रेणी चारमधील रिक्त पदे भरा़
* श्रेणी ४ मधील कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचे मार्ग पिरॅमिड तयार करावीत़
* आऊट सोर्सिंग किंवा कंत्राटी कामगार भरती पद्धत बंद करून कायम कामगारांची भरती करा़
------------------------------------------
फोटो - ११ एचआर ०८
वीज तांत्रिक कामगारांच्या वतीने निदर्शने करताना माजी केंद्रीय अध्यक्ष एस़ आऱ कोले, एस़ एस़ अंबुरे, व्ही़ आऱ लोणी, जी़ एम़ नगरे, बी़ एस़ गायकवाड, मोहन अलाट.

Web Title: Demonstrations of electricity technical workers