शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:19 IST

जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले.

 शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचे निधन अशा वेळी झाले जेव्हा काँग्रेस स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. काँग्रेसमध्ये कामराज यांच्यानंतर तीन संकटमोचक होते ते म्हणजे प्रणव मुख़र्जी, जितेंद्र प्रसाद आणि अहमद पटेल. मुख़र्जी राष्ट्रपती बनल्यानंतर पक्षापासून दूर गेले. जितेंद्र प्रसाद यांचे आधीच निधन झाले तर आता फक्त पटेल राहिले होते.

जेव्हा कधी पक्षासमोर राजकीय संकट आले तेव्हा मोठ्या चतुराईने पटेल यांनी दूर केले. निवडणूक रणनिती बनवण्यापासून, आघाडी सांभाळणे आणि पक्षातील असंतोषावर नियंत्रण मिळवण्याच्या महत्वाच्या मुद्यांवर पटेल यांनी आपले मत सोनिया गांधी यांना दिले.  पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून सोनिया गांधी यांच्यापर्यंत अहमद पटेल यांनी सगळ्या आघाड्यांवर महत्वाची भूमिका पार पाडली. पक्षासमोर आता काही मोजकेच चेहरे आहेत जे पक्षाला संकटातून बाहेर काढू शकतील. या मोजक्या नेत्यांमध्ये ऐ. के. अँटोनी, पी. चिदंबरम, अशोक गेहलोत आणि ग़ुलाम नबी आझाद यांचा समावेश आहे. 

ॲंटोनी आजारी असून पक्षाला जेवढी  सक्रियता हवी तेवढी ते दाखवू शकत नाहीत. चिदंबरम यांचा  स्वभाव आणि भाषा ही अडचण  आहे. अशोक गेहलोत यांचे नाव पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते. कारण ते गांधी कुटुंबाच्या जवळचे आहेत. ग़ुलाम नबी आझाद सध्या ग्रुप २३ चे सदस्य असून पक्ष नेतृत्वाची त्यांच्यावर नाराजी आहे.

टॅग्स :Ahmed Patelअहमद पटेलcongressकाँग्रेस