शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री रुग्णालय मागणी पडली धुळखात गत वर्षभरात ३० हजार स्त्रीवर ग्रामीण रुग्णालयात झाले उपचार

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

भोकर : मागील वर्ष भरात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० हजार ८४ स्त्री उपचारासाठी आल्या होत्या. खाजगी दवाखान्यातील संख्या किंबहुना एवढीच आहे. अशा परिस्थिती स्त्रीसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.

भोकर : मागील वर्ष भरात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० हजार ८४ स्त्री उपचारासाठी आल्या होत्या. खाजगी दवाखान्यातील संख्या किंबहुना एवढीच आहे. अशा परिस्थिती स्त्रीसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे.
मागील वर्ष भरात भोकर्‍या ग्रामीण रुग्णालयात ५९ हजार ६१० जणांची रुग्ण तपासणी झाली. यात ३० हजार ८४ स्त्री रुग्ण होत्या. विविध आजाराने ग्रस्त असलेल्या महिला खाजगी दवाखान्यात ही एवढ्या प्रमाणात उपचारासाठी जातात. स्त्रीयांचे वाढते आजार पाहता भोकर येथे स्त्री रुग्णालय व्हावी, अशी मागणी गत दहा वर्षापासून होत आहे. याबाबत ९ वर्षाखाली भोकर ग्रामपंचायतने स्त्री रुग्णालय उभारावे, यासाठी ठराव घेवून आरोग्य विभागाकडे मागणी केली होती. पण अद्याप पर्यंत भोकर येथे स्त्री रुग्णालयाल मंजुरी मिळाली नाही. गत वर्ष भरात ८५० स्त्रीयांनी ग्रामीण रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या पैकी चौघी जणांचे सिझरही झाले. १५२ स्त्री यावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ४ हजार ९११ स्त्रीयावर दाखल करुन घेवून उपचार करण्यात आले. यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे, डॉ. एम.के. हत्ते, डॉ. एस.व्ही. जाधव, डॉ. बालाजी पोटे, डॉ. एस.जी. देगलूरकर, डॉ. आर.जी. आवर्दे, डॉ. एम.बी. आयनिले, परिसेविका एस.बी. राठोड, अधिपरिचारिका सुरेखा कोकाटे, वैशाली कुलकर्णी, ऐरयल केदासे, तृप्ती विधाते आणिता स्वामी, ज्योती शेंडगे, अतुल कांबळे यांनी स्त्री रुग्णावर उपचाराची जबाबदारी पार पाडली.
स्त्री रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना भोकर येथे स्त्री रुग्णालयाची गरज आहे. पण या बाबीकडे आरोग्य विभाग मात्र दुर्लक्ष करत आहे. भोकर येथे स्त्री रुग्णालय झाल्यास स्त्रीयांचा फार मोठा प्रश्न सुटणार आहे.

चौकट
स्वाईन फ्ल्यूची कार्यशाळा संपन्न
भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूंची कार्यशाळा संपन्न झाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम इंगळे यांनी तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना स्वाईन फ्ल्यू आजाराची माहिती दिली. घ्यावयाची काळजी व उपचाराबाबत मार्गदर्शन केल. यावेळी डॉ.एम.के. हत्ते, डॉ. उत्तम जाधव, डॉ. पारवेकर, डॉ. मारावार, डॉ. साईनाथ वाघमारे, डॉ. मुद्दपीत उद्दीन, डॉ. विनायक थोरवट, डॉ. फिरोजखान इनामदार, डॉ. इनामदार, डॉ. जाजू, डॉ. मुक्कनवार, डॉ. राम नाईक, डॉ. आडे, डॉ.वसंत राठोड यांची उपस्थिती