शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांसाठी बदलणार दिल्लीचे वातावरण

By admin | Updated: January 19, 2015 11:05 IST

दिल्लीचे प्रदूषण तूर्तास भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही डोकेदुखी बनले आहे़ दिल्लीच्या प्रदूषणाने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची प्रकृती बिघडू शकते,

नितीन अग्रवाल, नवी दिल्लीदिल्लीचे प्रदूषण तूर्तास भारतासाठीच नाही तर अमेरिकेसाठीही डोकेदुखी बनले आहे़ दिल्लीच्या प्रदूषणाने अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची प्रकृती बिघडू शकते, अशी चिंता ओबामांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना सतावत आहे़ विशेष म्हणजे याचमुळे ओबामांच्या दौऱ्यावेळी किमान तीन दिवस दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत़ दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती याअनुषंगाने आखण्यात आलेल्या उपाययोजनांवर काम करीत आहे़प्रदूषणाशी निपटण्याच्या मोहिमेत लोकांना सहभागी करून घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत़ यासाठी सोशल नेटवर्किं ग साईटचा आधार घेतला जात आहे़ओबामा २५ ते २७ जानेवारीपर्यंत दिल्लीत असतील़ गत तीन वर्षांतील आकडेवारी बघता, या तारखांना दिल्लीच्या वातावरणात हानिकारक प्रदूषण पसरविणाऱ्या २़५ मायक्रोनपेक्षा लहान कणांची (आरपीएम) संख्या १३० ते २३४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर राहिली आहे़ याचा अर्थ दिल्लीच्या प्रदूषणाचा स्तर अमेरिकच्या मापदंडाच्या तुलनेत ८ पट, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मापदंडाच्या तुलनेत ५ पट आणि भारतीय मापदंडांच्या तुलनेत २ पट विषारी आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा २६ जानेवारीला प्रति क्युबिक मीटर हवेत आरपीएमचा स्तर ९० ते ११० मायक्रोग्रॅम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान ओबामा सुमारे अडीच तास राजपथावर असतील़ सूत्रांच्या मते, दिल्लीतील प्रदूषणाच्या भीतीने या काळात ओबामा कमीत कमी हवेच्या संपर्कात यावेत, असा कार्यक्रम अमेरिकन अधिकाऱ्यांनी आखला आहे़ यादरम्यान लुटियन झोनमध्ये वाहनांची संख्या कमीत कमी असावी, यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे़ रायसीला हिल्स भागात २३ जानेवारीपासूनच या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू होईल़ लुटियन झोनमधील सर्व शासकीय कार्यालयेही २४ जानेवारीपासून बंद राहतील़ याशिवाय जड वाहनांना रिंग रोडच्या बाहेर ठेवले जाईल़ एवढेच नव्हे तर दिल्लीत उघड्यावर स्वयंपाक करून प्रवाशांना जेऊ घालणारे ढाबेही या काळात बंद असतील़