शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
3
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
4
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
5
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
6
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
7
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
8
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
9
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
10
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
11
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
12
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
13
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
14
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
15
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
16
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
17
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
18
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
19
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
20
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:13 IST

Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: शाहीनचे दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद सोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहे. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत.

Dr. Shaheen Shahid confession, Delhi Red Fort Car Blast Updates: भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात १०हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर २०हून जास्त जण जखमी आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातील विविध सुरक्षा तपास यंत्रणा छापेमारी करत आहेत आणि स्फोटात सहभागी असलेल्यांचा शोध घेत आहेत. तपास यंत्रणांनी या स्फोटानंतर डॉ. शाहीन शाहिद हिला अटक केली आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले होते. चौकशीदरम्यान तिने अनेक खुलासे केले आहेत.

दोन वर्षांपासून स्फोटकं जमवण्याचे काम सुरू होते!

भारतातील जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर डॉ. शाहीन शाहिद गेल्या दोन वर्षांपासून स्फोटके साठवत होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शाहीन शाहिदची सतत चौकशी केली जात आहे. असे मानले जाते की या चौकशीतून आणखी बडे खुलासे होऊ शकतात. दिल्ली स्फोटाबाबत शाहीनची विशेष चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान तिने कबूल केले आहे की ती आणि तिचे सहकारी डॉक्टर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. जेव्हा जेव्हा ती डॉक्टर उमरला भेटायची तेव्हा तो उत्साहाने म्हणायचा की, देशभरात खूप सारे दहशतवादी हल्ले करायचे आहेत. तसेच शाहिन, मुजम्मिल आणि आदिल यांच्यासह सारेच दोन वर्षांपासून अमोनियम नायट्रेटसारखी स्फोटके गोळा करत होते. हे सर्व जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर केले जात होते.

डॉ. उमर दिल्ली स्फोटाचा 'मास्टरमाईंड'

सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटात वापरल्या गेलेल्या पांढऱ्या आय२० कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मेट्रो स्टेशनच्या पार्किंगमधून बाहेर पडताना काळा मास्क घातलेला एक माणूस गाडीत बसलेला दिसला. तो डॉ. उमर मुहम्मद नबी असल्याचे सांगितले जात आहे. तो काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी होता. दिल्ली स्फोटानंतर फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे. येथून ७ डॉक्टरांसह १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Doctor Confesses to Stockpiling Explosives for Two Years

Web Summary : Dr. Shaheen Shahid confessed to stockpiling explosives for two years. Linked to Jaish, she admitted planning terror attacks with accomplices. Dr. Umar, the suspected mastermind, is from Pulwama. Investigations continue at Al-Falah University.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटRed Fortलाल किल्लाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदdoctorडॉक्टर