शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:50 IST

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती ...

राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्याम माहितीनुसार, या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा फिदायीन दहशतवादी डॉ. उमर उन नबीने 'बूट बॉम्बचा' वापर केल्यी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

या प्रकरणी तपास यंत्रणांकडून कसून तपास केला जात आहे. हल्ल्यानंतर, यंत्रणांनी घटनास्थळावरून अनेक पुरावे एकत्र केले होते. यात उमरने हल्ल्यासाठी वापरलेल्या i20 कारमधून जप्त करण्यात आलेल्या एका बुटावर अत्यंत धोकादायक स्फोटक टीएटीपी (TATP) चे अंश आढळले आहेत. TATP अर्थात 'ट्रायएसिटोन ट्रायपेरॉक्साइड' (Triacetone Triperoxide) हे  अत्यंत संवेदनशील असते. एवढे संवेदनशील की, हलक्याशा घर्षणाने अथवा उष्णतेनेही त्याचा स्फोट होऊ शकतो. यामुळेच याला 'शैतान की मां' म्हणजेच 'सैतानाची आई' (Mother of Satan) असेही म्हटले जाते.

फिदायीन हल्ला करणाऱ्या डॉ. उमरने i20 मध्ये जे स्फोटक ठेवले होते, त्याचा ब्लास्ट करण्यासाठी बूटांमध्ये टीएटीपी ठेवले आणि त्याचा ब्लास्टसाठी वापर केला असावा, असे मानले जात आहे. कारण टीएटीपीचे काही अंश उमरच्या बुटावर आणि गाडीच्या टायरवरही आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, जैश-ए-मुहम्मदच्या दहशतवाद्यांनी मोठ्या हल्ला घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात टीएटीपी जमा केले होते आणि लाल किल्ला परिसरातील ब्लासमध्ये टीएटीपी आणि अमोनियम नायट्रेटच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला, अशी पुष्टी तपास पथकांनी केली आहे.

दरम्यान, या स्फोटापूर्वी फरीदाबादमधून दहशतवादी डॉक्टरांच्या ठिकाणांवरून तब्बल २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lal Qila Blast: 'Boot Bomb' Used; TATP Called 'Mother of Satan'

Web Summary : A Jaish-e-Mohammed operative likely used a 'boot bomb' with TATP, known as 'Mother of Satan,' in the Red Fort blast, killing 13. TATP traces were found on a boot and car. Ammonium nitrate was also used in the explosion.
टॅग्स :delhiदिल्लीTerrorismदहशतवादterroristदहशतवादी