Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 10:53 IST2025-11-16T10:52:41+5:302025-11-16T10:53:33+5:30

Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, तब्बल ४० फूट खाली देखील जमीन हादरली.

delhi red fort blast earth shakes 40 feet cctv footage panic at lal kila metro station | Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन

Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोट इतका शक्तिशाली होता की, तब्बल ४० फूट खाली देखील जमीन हादरली. आजुबाजूच्या परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही घटना कैद झाली आहे, ज्यामध्ये स्फोटाचे तीव्र धक्के आणि लोकांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे दिसून आली.

स्फोटानंतर काही सेकंदातच लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या आत असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालेल्या दृश्यावरून हा धक्का अत्यंत तीव्र असल्याची पुष्टी होते. स्टेशन पूर्णपणे अंडरग्राउंड आहे, मात्र तरीही अचानक झालेल्या भूकंपाने भिंती, खांब आणि दुकानांचे शटरही हादरले.

दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं , पण...

वर रस्त्यावर स्फोट झाला, परंतु त्याचा परिणाम थेट खाली असलेल्या मेट्रो स्टेशनपर्यंत जाणवला. आत असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांमधील कंपनं इतकी जोरदार होती की पाण्याच्या बाटल्या, पाकिटं आणि काउंटरवरील वस्तू हादरू लागल्या. फुटेजमध्ये सुरुवातीला लोक घाबरले आणि नंतर काही सेकंदातच पळून जाताना दिसत आहेत. कर्मचारीही घाबरून बाहेर पळताना दिसत आहेत.

दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम

दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा

स्फोटाचा आवाज इतका जोरदार होता की उपस्थितांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून येत होती. सुरुवातीला अनेकांना घडलेल्या घटनेची जाणीव झाली नाही. अचानक आलेल्या धुरामुळे आणि शॉकवेव्हमुळे वातावरण पूर्णपणे बदललं. काही लोकांनी कॉल करण्यासाठी त्यांचे फोन बाहेर काढले, तर काही जण सुरक्षिततेसाठी इकडे-तिकडे धावताना दिसले.

 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती

"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

लाल किल्ला मेट्रो स्टेशन पूर्णपणे अंडरग्राउंड आहे आणि स्फोट त्याच्या अगदी वर झाला. म्हणूनच कंपनं थेट खाली पोहोचली. अशी खोल कंपनं तेव्हाच जाणवतात जेव्हा स्फोट जास्त तीव्रतेचा असतो किंवा स्टेशनच्या अगदी जवळ असतो. घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि फॉरेन्सिक पथकं स्फोटाची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलीस आणि स्पेशल सेल स्फोटाचं स्वरूप, वापरलेली स्फोटकं आणि त्यामागे कोण असू शकतं याचा तपास करत आहेत.

Web Title : दिल्ली कार विस्फोट: नया वीडियो में जमीन हिलती हुई दिखाई दी

Web Summary : दिल्ली के लाल किले के पास एक शक्तिशाली कार विस्फोट से जमीन हिल गई। सीसीटीवी फुटेज में तीव्र झटके और डर दिख रहा है। भूमिगत मेट्रो स्टेशन पर भी कंपन महसूस हुई, जिससे दीवारें और दुकानें हिल गईं और लोग दहशत में आ गए।

Web Title : Terrifying Delhi Car Blast: New Video Shows Ground Shaking

Web Summary : A powerful car blast near Delhi's Red Fort shook the ground. CCTV footage reveals the intense shockwaves and fear. The underground metro station also felt the impact, with tremors shaking walls and shops as people panicked.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.