Delhi Violence : दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबर जारी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 08:59 PM2020-02-26T20:59:59+5:302020-02-26T21:44:49+5:30

जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे

delhi police appeal to the public to not pay heed to rumours. share helpline no vrd | Delhi Violence : दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबर जारी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Delhi Violence : दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबर जारी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

Next
ठळक मुद्देजाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत.कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी जनतेनं 22829334 आणि 22829335 या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी.

नवी दिल्लीःनागरिकत्व सुधारणा विधेयकावरूनदिल्लीत हिंसाचार उफाळून आलेला आहे. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत.
 
कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी जनतेनं 22829334 आणि 22829335 या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी. अफवांकडे दुर्लक्ष करण्याचंही दिल्ली पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे. आजची परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर नोंदवून घेतलेले असून, 106 जणांना अटक केली आहे. गैरवर्तणूक करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि ठाम पुरावे आहेत. आज कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, असंसुद्धा दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.


तत्पूर्वी पोलिसांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी काही मोबाइल नंबर जारी केले होते. जिथे लोक आपले कुटुंबीय किंवा इतर स्थितीसंबंधी माहिती मिळवू शकतील. ANIच्या वृत्तानुसार, दिल्लीतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांत पोलीस तैनात करण्यात आले असून, त्यांचे नंबरही जारी केलेले आहेत. गुरु तेग बहादूर रुग्णालयातून सब-इन्स्पेक्टर गजेंद्र सिंह यांच्याकडून माहिती मिळवता येत आहे. ज्यांचा मोबाइल नंबर 9818120026 आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयातूनही सब-इन्स्पेक्टर योगेंद्र सिंह माहिती देत आहेत. ज्यांचा मोबाइल नंबर 7982756328 आहे. मौलाना आझाद रुग्णालयातही 7982756328 या नंबरवर फोन केल्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. तिथे सब-इन्स्पेक्टर योगेंद्र सिंह तैनात आहेत. राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सब-इन्स्पेक्टर देवेंद्र सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्यांचा मोबाइल नंबर 9818313342 आहे. अल हिंद रुग्णालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र राणा पीडितांशी संबंधित माहिती देत आहेत. त्यांचा मोबाइल नंबर 9868738042 आहे.    

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

Web Title: delhi police appeal to the public to not pay heed to rumours. share helpline no vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.