Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 07:44 AM2020-02-26T07:44:23+5:302020-02-26T07:52:30+5:30

Delhi Violence News: पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत

Delhi Voilence: 'Who are these people in military outfits deployed in riot areas?' Shiv Sena Asked question to Modi Government PNM | Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Next
ठळक मुद्देभाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचेदिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती

मुंबई - दिल्लीत लष्कराला पाचारण केल्याचे वृत्त आले व लष्करी वेशातील लोक दंगलग्रस्त भागात तैनात असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. लष्करी पोशाखातील शेकडो जवानांचे संचलन जाफराबाद परिसरात झाले, पण “हे आमचे लष्कर नाही’’ असा खुलासा लष्कराच्या अधिकृत प्रवक्त्याने केला. मग दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण? असा सवाल शिवसेनेने सामना अग्रलेखातून विचारला आहे. 

तसेच याआधी ‘बुरखा’ वगैरे घालून भाजपची एक कार्यकर्ती शाहीनबाग आंदोलकांच्या गर्दीत घुसली होती. त्यामुळे नक्की कोण कोणाच्या पोशाखात व मुखवटय़ात फिरत आहेत ते समजायला मार्ग नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने अशा भयपटाने व्हावे हे बरे नाही. अहमदाबादमध्ये ‘नमस्ते’ आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी याआधी कधीच झाली नव्हती असा टोलाही शिवसेनेला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे 

  • सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने दिल्लीत हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूने हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. ट्रम्पसाहेब हे प्रेमाचा संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्या समोर हे काय घडले? 
  • पंतप्रधान मोदी व ट्रम्पसाहेब यांच्यात चर्चा सुरू असताना शहर जळत होते. दंगलीमागची कारणे काहीही असोत, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले आहे असा गदारोळ उठू शकतो. 
  • 1984 सालचा शीखविरोधी दंगलीचा ठपका आजही काँग्रेसवर ठेवला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समुदायास लक्ष्य करण्यात आले व त्यात शेकडो शीख बांधवांचे बळी गेले. त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याची ओरड इतक्या वर्षांनंतरही भाजपचे लोक करीत आहेत. 
  • दिल्लीत सध्या हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे, लोक रस्त्यांवर काठय़ा, तलवारी, रिव्हॉल्व्हर घेऊन उतरले आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत. एखाद्या भयपटाचे चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे, ते 1984 च्या दंगलीचीच भयाण वास्तवता दाखवणारे आहे. 
  • दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व आपले पंतप्रधान मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत असताना त्यांच्या डोळ्यांसमोर हा असा रक्तपात व्हावा हे दृष्य काही चांगले नाही. 
  • दिल्ली विधानसभा निवडणूक आटोपल्यावर हिंसाचार उसळला आहे हे रहस्यमय आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला व आता दिल्लीची ही अशी दशा झाली आहे.
  • भाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली असे सांगितले जाते. म्हणजे शांतपणे चाललेले हे आंदोलन भडकावे व त्याचे पर्यावसान आज भडकलेल्या दंगलीत व्हावे अशी कुणाची इच्छा होती काय? निदान ट्रम्प महाराज परत जाईपर्यंत तरी संयम राखायला हवा होता. 
  • ट्रम्प यांच्या पायगुणाने देशात, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढणार असेल तर क्षेपणास्त्र व्यवहाराकडे एक व्यापारी करार म्हणून पाहायला हवे. प्रश्न पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी क्षेपणास्त्रे मिळाली हा नसून मोठा फौजफाटा हाती असूनही दिल्लीची दंगल आटोक्यात येत नाही हा आहे. 
  • पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक आहे. या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत व ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे असे गृहमंत्रालय म्हणत आहे, 
  • पण असे कारस्थान रचले व रटारटा शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. ज्या हिमतीने कश्मीरात 370, ‘35 ए’ सारखी कलमे हटवली, त्याच हिमतीने दिल्लीतील दंगलीवरही नियंत्रण मिळवायला हरकत नव्हती. 
     

Web Title: Delhi Voilence: 'Who are these people in military outfits deployed in riot areas?' Shiv Sena Asked question to Modi Government PNM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.