शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Delhi Mundka Fire : दिल्लीतील अग्नितांडवात फॅक्ट्री मालक वरुण आणि हरीश यांच्या वडिलांचाही होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 11:39 AM

सांगण्यात येते की, ही आग लागली, तेव्हा मोटिवेशनल स्पीच सुरू होते...

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत कंपनी मालक वरुण आणि हरीश गोयल यांचे वडील अमरनाथ यांचाही मृत्यू झाला आहे. सांगण्यात येते की, ही आग लागली, तेव्हा मोटिवेशनल स्पीच सुरू होते. यावेळी अमरनाथही तेथे उपस्थित होते. मात्र, आग एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती, की त्यांना तेथून बाहेर पडता आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध अमरनाथ गोयल हे देखील इतर लोकांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर होरपळले होते आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे याप्रकरणी, कमर्शिअल बिल्‍ड‍िंगमध्ये कंपनी चालविणाऱ्या हरीश गोयल आणि वरुण गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर इमारतीचे मालक मनीष लाकडा सध्या फरार आहेत.

या तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावर मॅन्युफॅक्चरिंग युनिट होते. दुसऱ्या मजल्यावर वेअर हाऊस तर तिसऱ्या मजल्यावर लॅब होती. सर्वाधिक मृत्यू आतापर्यंत दुसऱ्या मजल्यावरच झाल्याचे बोलले जात आहे. या दुसऱ्या मजल्यावरच मोटिवेशनल स्पीच सुरू होते. या कार्यक्रमामुळेच येथे अधिक लोक एकत्रित आले होते.

30 हून अधिक बंब पोहोचले होते घटनास्थळी -या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या कोणत्याही जवानाला इजा झालेली नाही. सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी तैनात होत्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. दरम्यान, 50 हून अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे, तर 27 लोकांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रात्री 11 वाजता या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आल्याचेही अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :delhiदिल्लीfireआगFire Brigadeअग्निशमन दल