शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus: गौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे का; दिल्ली हायकोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 2:45 PM

CoronaVirus: भाजप खासदार गौतम गंभीर यांचा उल्लेख करत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

ठळक मुद्देदिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरेगौतम गंभीर यांना औषधे वाटपाचं लायसन्स दिले आहे काकोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषध वाटपावर आक्षेप

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये, तर सर्वोच्च न्यायालयाही कोरोनाशी निगडीत याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दिल्लीउच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी भाजप खासदार गौतम गंभीर यांचा उल्लेख करत न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (delhi high court asked that does bjp mp gautam gambhir have any license to deal corona drug)

अलीकडेच माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचे वाटप केले आहे. याची दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेत आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजप खासदार गौतम गंभीर कोरोना उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधे खरेदी करण्यासाठी सक्षम आहेत का, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने यावेळी केला. न्या. न्यायाधीश विपीन सांघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. 

आता देशाला उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत

उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची सरबत्ती

औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचं वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते? औषधे वाटण्यासाठी खासदार गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतले होते का? कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे वाटप करत होते? असे थेट प्रश्न दिल्ली उच्च न्यायालयाने उपस्थित केले. 

दिल्लीत केंद्राचा नवा कायदा लागू; आता नायब राज्यपाल हेच ‘सरकार’

फॅबीफ्ल्यू औषध वाटपावर आक्षेप

दिल्ली सरकारच्या वकिलाने न्यायालयात यासंदर्भात बाजू मांडली. रुग्णांच्या नातेवाइकांना किंवा जनतेला फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता फॅबीफ्ल्यू औषधांचे मोफत वाटप करत आहे, ही बाब वकिलांनी न्यायालयासमोर आणली. तेव्हा न्यायालयाने हे काम चांगले आहे. पण पद्धत चांगली नाही, असे मत व्यक्त केले. 

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानेही ऑक्सिजन तुटवड्यावरून केजरीवाल सरकारची कानउघडणी केली. दिल्ली सरकारला परिस्थिती सांभाळता येत नसेल, तर तसे आम्हाला सांगावे. अन्यथा यासंदर्भातील जबाबदारी केंद्राकडे सोपवतो, असा इशारा दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला दिला आहे. दिल्लीतील ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दिल्ली सरकारने कंबर कसावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयBJPभाजपाGautam Gambhirगौतम गंभीर