शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

दिल्ली बदलतेय! भाजपाच्या गोटात उत्साहाचे भरते; केजरीवाल तणावात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 12:03 PM

दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होती. यामुळे 70 पैकी 65 तरी जागा आपला मिळतील असा भाजपाचाच निवडणूक जाहीर होण्याआधी सर्व्हे आला होता.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होतीमोदींच्या सभांमुळे वातावरण बदलत असल्याचे सर्व्हेतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. या सर्व्हेमध्ये समोर आले आहे की, शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राईक, बाटला हाऊस आदी मुद्द्यांवर मोदींनी ज्या प्रकारे बाजू मांडली आहे त्याचा फरक दिसू लागला आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. 

नवी दिल्ली : सीएए, एनआरसीवरून राजधानी दिल्ली गेल्या महिनाभरापासून तापलेली असतानाच पुन्हा केजरीवालच मुसंडी मारणार असल्याचा खुद्द भाजपाचाच सर्व्हे आला होता. यामुळे दिल्लीतील नेत्यांची हवाच निघून गेली होती. दिल्लीमध्ये देशभरातील भाजपा नेते, प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्र्यांना पाचारण करण्यात आले होते. तर सोडून गेलेल्या मित्रपक्षालाही पुन्हा सोबत घेतले होते. हे प्रयत्न कुठेतरी फलदयी ठरत असल्याचे भाजपाच्या दुसऱ्या अंतर्गत सर्व्हेमध्ये दिसत आहे. 

दिल्लीमध्ये आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी पहिली पसंती दिली होती. यामुळे 70 पैकी 65 तरी जागा आपला मिळतील असा भाजपाचाच निवडणूक जाहीर होण्याआधी सर्व्हे आला होता. यामुळे पहिल्यापासून गृहमंत्री अमित शहा दिल्लीमध्ये प्रचाराला उतरले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जोर लावला आहे. मोदींच्या सभांमुळे वातावरण बदलत असल्याचे सर्व्हेतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. भाजपाचा अंतर्गत सर्व्हे पूर्व दिल्लीमध्ये सोमवारी झालेल्या मोदी य़ांच्या सभेनंतर तेथील सर्व मतदारसंघांमध्ये करण्यात आला. या सर्व्हेमध्ये समोर आले आहे की, शाहीन बाग, सर्जिकल स्ट्राईक, बाटला हाऊस आदी मुद्द्यांवर मोदींनी ज्या प्रकारे बाजू मांडली आहे त्याचा फरक दिसू लागला आहे, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केला आहे. 

भाजपातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या रॅलीपूर्वी जेवढे सर्व्हे झाले त्यामध्ये भाजपा दिल्लीमध्ये आपला टक्कर देताना दिसत आहे. मात्र, निकाल आपच्याच बाजुने दिसत होते. आता योगी आदित्यनाथ आणि मोदी यांच्या सभांमुळे निकाल भाजपाच्या बाजुने लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. खास बाब म्हणजे काही जागांवर काँग्रेस बाजी मारणार असल्याचेही समोर येत आहे. 

सोमवारी सायंकाळी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला 70 पैकी 27 जागा मिळताना दिसत आहेत. तर आपला 26, काँग्रेसला 8 ते 9 जागा मिळत असल्याचे आकडे आहेत. तर उरलेल्या जागांवर अटीतटीची लढत होणार आहे. मंगळवारीही मोदींना दिल्लीमध्ये सभा घेतली. यानंतर हे आकडे बदलण्याची शक्यता भाजपाने वर्तविली आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा