शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:23 IST

Delhi Car Blast: गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात वापरलेल्या तंत्रामुळे देशातील सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांनाही धक्का बसला; कारण, ‘बूट सुसाइड बॉम्ब’चा वापर यात करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे.

हरिश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: गेल्या १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात वापरलेल्या तंत्रामुळे देशातील सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांनाही धक्का बसला; कारण, ‘बूट सुसाइड बॉम्ब’चा वापर यात करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. ट्रायसेटोन ट्रिपरॉक्साईड (टीएटीपी) रसायन केवळ बुटाने रगडून हा स्फोट घडवण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय, या कटात व्हाइट कॉलर ‘डॉक्टर दहशतवादी नेटवर्क’ सक्रिय होते. दहशतवादाचा हा नवा मार्ग देशात चिंता वाढवणारा ठरला आहे. सुदैवाने हा धोका टळला असला तरी बुटाच्या माध्यमातून स्फोट घडवण्याचे हे तंत्र तपास संस्थांसमोर नवे आव्हान ठरणारे आहे.

दोन वर्षांपासून कारस्थान

या दहशतवादी गटाने नव्या रूपात दोन वर्षांपासून कट-कारस्थाने केली; परंतु याची कोणतीच माहिती गुप्तचरांकडे नव्हती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावर या कारवाया सुरू आहेत. 

यापूर्वीही असे आत्मघाती हल्ले

२०१९ मध्ये स्फोटकांनी भरलेली व्हॅन लष्करी ताफ्यावर धडकावून केलेल्या भीषण हल्ल्यात ४० सैनिक शहीद झाले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये तामिळनाडूत कोईम्बतूरमध्ये पोटॅशियम नायट्रेटसारख्या रसायनांनी भरलेल्या कारचा स्फोट झाला. यात इसिसचा स्वयंघोषित दहशतवादी जमिशा मोबिन मारला गेला होता. 

छाप्यात या  गोष्टी सापडल्या

या छाप्यात ज्या अनियमितता आढळल्या त्यात घोषित व्यावसायिक पत्त्यावर प्रत्यक्षात काहीच अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. विविध कंपन्यांशी संबंधित खात्यांत एकच मोबाइल क्रमांक व ई-मेल असल्याचे दिसून आले असून संस्थेने ईपीएफओमध्ये किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळात कोणतीही नोंदणी केलेली नाही. कंपन्यांचे संचालक किंवा प्राधिकृत लोकांच्या स्वाक्षऱ्याही संशयास्पद असून, केवायसी कागदपत्रांतही त्रुटी आढळून आल्या आहेत.

२५ ठिकाणची झडती

लाल किल्ला परिसरातील कार स्फोटाच्या तपासात ‘ईडी’ने मंगळवारी हरियाणातील फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठात तसेच या संस्थेच्या प्रशासनाशी संबंधित लोकांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकले. अल फलाह ग्रुपचे संचालक जावेद अहमद सिद्धिकी यांना मंगळवारी ईडीने अटक केली. त्यांच्यावर पीएमएलए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहाटे सव्वापाचपासून तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विद्यापीठाच्या सुमारे २५ परिसराची झडती घेतली. या विद्यापीठाचे एक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या परिसरात आहे. ओखला भागातील एका कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. ‘ईडी’च्या या कारवाईदरम्यान ‘एनआयए’ने दोघांना ताब्यात घेतले. यूजीसीसह एनएएसीच्या मान्यतेसंबंधी दाव्यांत प्रारंभिक चौकशी विसंगत नोंदी आढळल्या आहेत. बँकिंगच्या माध्यमातून अनेक कंपन्यांत कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन देणे, असे घोटाळे या विद्यापीठाशी संबंधित व्यवहारात आढळून आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: 'Boot Suicide Bomber' Technique Alerts Intelligence Agencies

Web Summary : The Delhi blast revealed a 'boot suicide bomb' tactic, alarming security agencies. Investigations revealed the use of TATP and a 'doctor terrorist network'. Raids uncovered irregularities at Al Falah University, with ED arresting Javed Ahmed Siddiqui for money laundering.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट