दीपालीनगरला पाणीटंचाई

By Admin | Updated: March 21, 2015 00:14 IST2015-03-20T22:39:47+5:302015-03-21T00:14:24+5:30

इंदिरानगर : ऐन उन्हाळ्यात दीपालीनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलावर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Deepalinagar water shortage | दीपालीनगरला पाणीटंचाई

दीपालीनगरला पाणीटंचाई

इंदिरानगर : ऐन उन्हाळ्यात दीपालीनगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलावर्गांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दीपालीनगर परिसरात तीन हजार लोकांची वस्ती आहे. बहुतेक नोकरदार वर्ग आहेत. गेेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हरिभक्तिधाम, धनसंपदा, यशराज, पाटील प्राईड, जिव्हाळा, रामरक्षा, सुविचार, मुठेचाळ सहदीपालीनगर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दुपारी बारा ते दोन वाजेच्या दरम्यान होणारा पाणीपुरवठा कमीदाबाने होतो. यामुळे पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही. त्यामुळे हातपंपावर गर्दी दिसून येत आहे. परिसरात दिवसंेदिवस वाढणारी लोकवस्तीच्या मानाने सुमारे दहा वर्षांपूर्वीची कमी व्यासाची जलवाहिनी अपुरी पडत आहे. जास्त व्यासाची जलवाहिनी टाकण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून आहे. पाणीपुरवठा विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Deepalinagar water shortage