बायकोचा शिरच्छेद करून नवऱ्याचे समर्पण

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:28+5:302014-12-18T22:39:28+5:30

जमशेदपूर-बायकोच्या दारू पिण्याच्या सवयीने कंटाळलेल्या नवऱ्याने तिचा शिरच्छेद करून तिचे मुंडके घेऊन जवळच्या पोलीस शिबिरात आत्मसमर्पण केल्याची घटना येथे घडली.

Dedication of husband by beheading a wife | बायकोचा शिरच्छेद करून नवऱ्याचे समर्पण

बायकोचा शिरच्छेद करून नवऱ्याचे समर्पण

शेदपूर-बायकोच्या दारू पिण्याच्या सवयीने कंटाळलेल्या नवऱ्याने तिचा शिरच्छेद करून तिचे मुंडके घेऊन जवळच्या पोलीस शिबिरात आत्मसमर्पण केल्याची घटना येथे घडली.
येथील घाटशिला भागातल्या गलुडिहमध्ये राहणाऱ्या मोनू कर्माकर या बायकोच्या दारू पिण्यापायी कंटाळेल्या रिंगटू कर्माकर याचे तिच्यासोबत दारूवरून जोरदार भांडण झाले. त्यात संपातून जाऊन त्याने कुऱ्हाडीचा घाव घालून तिचा शिरच्छेद केला. यात तिचे निधन झाले. त्यानंतर त्याने तिचे मुंडके कापून घेतले व ते घेऊन जवळच्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शिबिरात जाऊन आत्मसमर्पण केले. त्याला पोलिसांच्या हवाली केले असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Dedication of husband by beheading a wife