झारखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध मोदींच्या सभेत घोषणा

By Admin | Updated: August 22, 2014 01:46 IST2014-08-22T01:46:22+5:302014-08-22T01:46:22+5:30

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपा कार्यकत्र्याकडून खिल्ली उडवली गेली़ गुरुवारी येथील वीज प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडला़

Declaration in front of Jharkhand Chief Ministers Modi's meeting | झारखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध मोदींच्या सभेत घोषणा

झारखंड मुख्यमंत्र्यांविरुद्ध मोदींच्या सभेत घोषणा

रांची : महाराष्ट्र आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत भाजपा कार्यकत्र्याकडून खिल्ली उडवली गेली़ गुरुवारी येथील वीज प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी हा प्रकार घडला़
मुख्यमंत्री सोरेन यांनी भाषण सुरू करताच, समोर उपस्थित शेकडो भाजपा कार्यकत्र्यानी एकच गोंधळ केला़ यानंतर त्यांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी सुरू केली़ गोंधळ वाढल्यामुळे मोदींनी हात दाखवून कार्यकत्र्याना शांत राहण्याचा इशारा केला़ 
यादरम्यान सोरेन काही क्षण थांबले मात्र नंतर त्यांनी नेटाने भाषण पूर्ण केल़े एवढेच नाही तर पंतप्रधान उपस्थित असताना व्यासपीठाची प्रतिष्ठा समजा आणि ती कायम राखा, असे दटावलेही.
गत आठवडय़ात मोदी हरियाणात गेले तेव्हा तेथील कार्यक्रमांमध्ये भाजपा कार्यकत्र्यानी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांची टर उडवून त्यांना बोलूही दिले नव्हते. त्यानंतर हुडा यांनी मोदींच्या कार्यक्रमांना यापुढे हजर न राहण्याचे जाहीर केले होत़े यानंतर मोदी गेल्या आठवडय़ात पॉवर ग्रीडच्या कार्यक्रमासाठी सोलापूरला आले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही काहीसा तसाच अनुभव आला. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Declaration in front of Jharkhand Chief Ministers Modi's meeting