शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशात लसीकरण यादीत मोठा घोळ; मृत नर्स आणि निवृत्त डॉक्टरांचा समावेश

By देवेश फडके | Updated: January 13, 2021 10:36 IST

प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे लसीकरण यादीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील अयोध्येत कोरोना लसीकरण यादीत घोळमृत नर्स, निवृत्त आणि करार संपलेल्या डॉक्टरांच्या नावांचा समावेशयादीतील घोळाच्या चौकशीचे सरकारकडून आदेश

अयोध्या : कोरोना संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात आता लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. १६ जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरण केले जाणार आहे. मात्र, प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशमधीलअयोध्या येथे लसीकरण यादीत मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येत तयार करण्यात आलेल्या लसीकरण लाभार्थ्यांच्या यादीत मृत नर्स, निवृत्त आणि करार संपुष्टात आलेल्या डॉक्टरांचाही समावेश करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. उत्तर प्रदेशात १६ जानेवारीपासून ८५२ केंद्रांवर आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. 

कोरोना लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीत आरोग्य विभाग आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, अयोध्येतील कोरोना लस देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत घोळ झाल्याचे समजताच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. 

उत्तर प्रदेशात डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. स्वतंत्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संख्या केवळ ८ ते १० हजारांच्या घरात आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम पाहायला मिळतो. सरकार आता नवीन धोरण आणण्याच्या तयारीत असून, आता थेट लोकसेवा आयोगातून भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जय प्रताप सिंह यांनी दिली.

दरम्यान, १६ जानेवारीपासून संपूर्ण देशात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील एकूण ८५२ केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशातील १५०० केंद्रांवर लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वीरित्या पार पडली होती. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्या