शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवाशांचे मृतदेह आसनाला जखडलेले?

By admin | Updated: January 3, 2015 02:37 IST

एअर आशियाच्या दुर्दैवी जेट विमानाचे अवशेष जावा समुद्रात ५ कि.मी. परिसरा पसरले असून, शोधपथकाने आज ३० मृतदेह वर आणले आहेत

मोठा सांगाडा, ब्लॅक बॉक्ससाठी शोधमोहीम : ३० मृतदेह सापडले, तिघांची ओळख पटली जकाता/सिंगापूर : रविवारी गूढरीत्या अपघातग्रस्त झालेल्या एअर आशियाच्या दुर्दैवी जेट विमानाचे अवशेष जावा समुद्रात ५ कि.मी. परिसरा पसरले असून, शोधपथकाने आज ३० मृतदेह वर आणले आहेत. त्यापैकी तिघांची ओळख पटली आहे; तर शोधपथकाच्या मते राहिलेले १३२ मृतदेह अजूनही विमानाच्या आसनाला जखडलेले आहेत. समुद्रतळाशी असणाऱ्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी बहुराष्ट्रीय शोध पथकाकडे अत्याधुनिक उपकरणे आहेत. एअर बस ३२० च्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी अपघात स्थळी लक्ष कें द्रित करण्यात आले असून, विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शोधमोहिमेसाठी वादळग्रस्त हवा ही प्रमुख चिंता होती. रविवारपर्यंत पाऊस, जोरदार वारे व चार मीटर उंचीच्या लाटा उसळत होत्या, असे इंडोनेशियाच्या मदत पथकाचे प्रमुख रिअर मार्शल हेन्री बाम्बांग सोएलिसियो यांनी म्हटले आहे. विमानाचा मोठा सांगाडा शोधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे, तर विमानाचा ब्लॅकबॉक्स शोधणे हे दुसरे महत्त्वाचे काम, असे सोएलिसियो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (वृत्तसंस्था)शोधपथकातील फ्रॉग टीम समुद्राच्या तळापर्यंत जात असून विमानाचा सांगाडा शोधला जात आहे. १६२ पैकी ३० मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून, बाकीचे मृतदेह एअर आशियाच्या दुर्दैवी विमानातील आसनालाच अजूनही जखडलेले असावेत असा अंदाज आहे. पाणबुडे बांदा एक येथील नौदलाच्या जहाजात असून विमानाचा सांगाडा असणाऱ्या ठिकाणी ते पाण्यात उडी घेण्यास सज्ज आहेत. हा सांगाडा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.