संघात निवडीसाठी डीडीसीए पदाधिकारी सेक्सची मागणी करायचे - केजरीवाल

By Admin | Updated: December 29, 2015 15:43 IST2015-12-29T15:43:05+5:302015-12-29T15:43:05+5:30

दिल्ली क्रिकेट संघटनेवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यापुढे जाऊन एक गंभीर आरोप केला आहे.

DDCA office bearers demand sex selection - Kejriwal | संघात निवडीसाठी डीडीसीए पदाधिकारी सेक्सची मागणी करायचे - केजरीवाल

संघात निवडीसाठी डीडीसीए पदाधिकारी सेक्सची मागणी करायचे - केजरीवाल

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २९ - दिल्ली क्रिकेट संघटनेवर आतापर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यापुढे जाऊन एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला आहे. 
दिल्ली क्रिकेट संघामध्ये मुलाची निवड हवी असेल तर, एक रात्र सोबत करायला या अशी डीडीसीएच्या पदाधिका-याने एका वरिष्ठ पत्रकाराच्या पत्नीला ऑफर दिली होती असा दावा केजरीवालांनी केला आहे. केजरीवालांनी आरोप केला असला तरी, त्याने त्याचे पुरावे दिलेले नाहीत. तो पत्रकार साक्ष द्यायला तयार आहे असेही केजरीवालांनी सांगितले. 
आर्थिक भ्रष्टाचारा नाही तर, डीडीसीएमध्ये सेक्स रॅकेटही चालते असा आरोप केजरीवालांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भित्रे, मनोरुग्ण म्हटल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: DDCA office bearers demand sex selection - Kejriwal