शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख... आता तो काळ गेला : गृहमंत्री शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:42 IST

तीन फौजदारी विधेयके राज्यसभेतही मंजूर; संविधानाची निर्मिती करताना, घटनाकारांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्यायावर भर दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांची जागा घेणाऱ्या भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर ती कायद्यात परावर्तित होतील. नव्या कायद्यांमुळे तारीख पे तारीख ही पद्धत कालबाह्य होईल आणि कोणत्याही प्रकरणात कमीत कमी तीन वर्षांत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

संविधानाची निर्मिती करताना, घटनाकारांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्यायावर भर दिला होता. आताही नव्या कायद्यांद्वारे शिक्षेऐवजी न्याय देण्याला प्राधान्य दिल्याने संविधानातील न्यायाची गॅरंटी ही तीन विधेयके देतील, असे शाह म्हणाले. सभागृहाबाहेर काही लोक म्हणतात की, या कायद्यांमुळे किती फरक पडणार आहे? त्यांना मी सांगतो, की या कायद्यांमुळे आम्ही लोकांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू. 

तीन खासदार निलंबितलोकसभेतील काँग्रेसचे दीपक बैज, डी.के. सुरेश आणि नकुल नाथ यांना अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी निलंबित केले. त्यामुळे लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या १००, तर दोन्ही सभागृहांतील निलंबितांची संख्या १४६ वर गेली.

निवडणूक आयुक्त नियुक्ती विधेयक मंजूरमुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती आणि त्यांच्या सेवाशर्थींशी संबंधित विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेतही मंजूर झाले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की, आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भातील कायदा होईपर्यंत त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील तीन सदस्यीय समितीकडून होईल, असा निकाल न्यायालयाने मार्च महिन्यात दिला होता. 

दूरसंचार विधेयकावर राज्यसभेचीही मोहोरदूरसंचार विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. हे विधेयक १३८ वर्षे जुने टेलिग्राफ कायद्याची जागा घेईल. नव्या कायद्यामुळे दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

वृत्तपत्रांची नोंदणी सोपीवृत्तपत्रे तसेच नियतकालिकांची नोंदणी प्रक्रिया अधिक सोपी करणाऱ्या प्रेस व नियतकालिक पत्रिका नोंदणी विधेयक लोकसभेतही मंजूर झाले. वृत्तपत्राची नोंदणी आता केवळ दोन महिन्यांमध्ये होईल.  

संसदेची सुरक्षा आता सीआयएसएफकडे संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता पूर्णपणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) असेल. संसद सुरक्षा सेवा (पीएसएस), संसद कर्तव्य गट (पीडीजी) हेदेखील सुरक्षा सेवेत राहतील. सीआयएसएफ नवीन संसद भवन, जुने संसद भवन आणि संसद भवन ॲनेक्सी या तीन इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. सुरक्षा मानकांपासून कोणालाही सूट दिली जाणार नाही. प्रत्येक खासदार, मंत्र्याला कठोर तपासणीतून जावे लागेल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRajya Sabhaराज्यसभा