दहीहंडीसाठी खंडणी मागणार्‍या चौघांवर गुन्हा दोघांना जागेवरच पकडले : ‘फौजदार चावडी’ची तत्परता

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:36+5:302015-09-07T23:27:36+5:30

सोलापूर :

Dashihandi's arrest on both sides demanding ransom: 'Faujdar Chawdi' readiness | दहीहंडीसाठी खंडणी मागणार्‍या चौघांवर गुन्हा दोघांना जागेवरच पकडले : ‘फौजदार चावडी’ची तत्परता

दहीहंडीसाठी खंडणी मागणार्‍या चौघांवर गुन्हा दोघांना जागेवरच पकडले : ‘फौजदार चावडी’ची तत्परता

लापूर :
दहीहंडी उत्सवासाठी नवीपेठेतील विशाल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अशोक मोहनदास आहुजा यांना सक्तीने वर्गणी मागणार्‍या चौघांवर फौजदार चावडी पोलिसांनी रविवारी खंडणीचा गुन्हा दाखल केला.
बाबू उर्फ गणेश विजय चव्हाण, सोमेश उर्फ किरण मदन बनसोडे, अर्जुन आणि तम्मा (चौघे रा. पत्रा तालीम, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पैकी बाबू आणि सोमेश यांना पोलिसांनी जागेवरच पकडून त्यांना रीतसर अटक केली. अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले. रविवारी चौघे दहीहंडी उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी विशाल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आले होते. चौघांनी मोठी वर्गणीची मागणी केल्यावर आहुजा यांनी नकार दिला. त्यावर चिडलेल्या आरोपींनी ‘तू काय तुझा बाप देईल, आता तुमच्या सर्वच व्यापार्‍यांकडून पैसे काढतोच’ असे धमकावले. आहुजा यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, तपास पोलीस निरीक्षक भांबुरे करीत आहेत. (प्रतिनिधी)
इन्फो बॉक्स
एक कॉल केला, अन्...
पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणार्‍या बहाद्दरांना आळा घालण्याचा विडा उचलला आहे. व्यापार्‍यांच्या बैठकीत त्यांनी असे प्रकार घडत असतील तर थेट मला अथवा संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. हा धागा पकडून आहुजा यांनी पो. नि. भांबुरे यांच्याशी संपर्क साधला. काही मिनिटांमध्येच भांबुरे हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना जागेवरच अटक केली. ‘एक कॉल.. आपलाच फायदा’ याची प्रचिती आहुजा यांना आली.

Web Title: Dashihandi's arrest on both sides demanding ransom: 'Faujdar Chawdi' readiness