नवी दिल्ली : डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन मार्केटप्लेस आणि ड्रोन यांनी देशासमोर निर्माण केलेले आव्हान कायम असून, त्याचा सामना करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागतील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
शाह यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर विभागीय परिषद येथे संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, देशात अमली पदार्थ तस्करी होऊ दिली जाणार नाही. सरकारने तस्करीचे अनेक नेटवर्क संपविण्यात यश मिळविले. त्याच्याशी संबंधित दहशतवादही नष्ट केला.
जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि उत्तर प्रदेशात अमली पदार्थ - दहशतवादाच्या अनेक प्रकरणांचा भंडाफोड करण्यात आला. शाह यांनी म्हटले की, डार्क वेब, क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन मार्केटप्लेस आणि ड्रोनचा वापर यांनी निर्माण केलेले आव्हान मात्र आजही कायम आहे.
जप्तीचे प्रमाण वाढलेशाह यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थांच्या विरोधातील लढ्याला नवी शक्ती मिळाली आहे.१० वर्षांत अमली पदार्थांच्या जप्तीचे प्रमाण ७ पट वाढले आहे. हे मोठे यश आहे. २०२४ मध्ये १६,९१४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थ नियंत्रण संस्था आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.२००४ ते २०१४ या दशकात ३.६३ किलो मादक पदार्थ जप्त करण्यात आले होते. २०१४ ते २०२४ या दशकात २४ लाख किलो मादक पदार्थ जप्त करण्यात आले होते. मागच्या दशकाच्या तुलनेत हा आकडा ७ पट अधिक आहे.