शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या सबसिडीचे गोलमाल

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

एकाची सबसिडी दुसऱ्याच्या खात्यात : ग्राहक त्रस्त, प्रशासन सुस्त

एकाची सबसिडी दुसऱ्याच्या खात्यात : ग्राहक त्रस्त, प्रशासन सुस्त
नागपूर : केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी आधारमार्फत देण्याच्या योजनेला नव्याने सुरुवात केली आहे. मात्र या योजनेमुळे ग्राहकांना येणाऱ्या समस्याने मानसिक त्रास आणि आर्थिक भुदंर्ड सोसावा लागत आहे. ग्राहकांना गॅससिलिंडर घरपोच मिळत असले तरी सबसिडी मात्र दुसऱ्याच बँक खात्यात जमा होत असल्याचे प्रकार पुढे आले आहे.
काँग्रेस आघाडी सरकारने आधार योजना अमलात आणली. त्यावेळी विरोधकाची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने या योजनेला कमालीचा विरोध दर्शविला होता; केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर २०१४ पासून पुन्हा सिलिंडरची सबसिडी आधारमार्फत बँकांच्या खात्यात जमा करणे सुरू केले. हे करताना आधी ग्राहकांना मानसिक त्रास आणि आगाऊ भुदंर्ड बसणार नाही, याचा शोध घेऊन ही समस्या निकाली काढणे अनिवार्य होते. मात्र सरसकट योजना ग्राहकांवर लादली गेली. सिलिंडर घरी आल्यानंतर सबसिडीसहीत सर्व रक्कम त्याला मोजून द्यावी लागते. त्यानंतर ८ दिवसाच्या आत सबसिडीची रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा होते. मात्र अनेक ग्राहकांची सबसिडी खात्यात जमा झाली नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहे. अशीच एक तक्रार लोकमतच्या हाती लागली. त्याचा पाठपुरावा केला असता या प्रक्रियेत होत असलेला गोलमाल पुढे आला.
हुडकेश्वर परिसरातील इंडियन गॅस कंपनीच्या एका ग्राहकाच्या घरी २२ जानेवारीला सिलिंडर पोहचले. अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यात सबसिडीची रक्कम जमा झाली नव्हती. या प्रकरणात लोकमतने ग्राहक ाच्या गॅस एजन्सीत चौकशी केली. गॅस एजन्सीकडून सबसिडीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ग्राहकाचे खाते असलेल्या बँकेत विचारणा केली, त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर गॅस कंपनीच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क केला, त्यांनी गॅस एजन्सीत चौकशी करण्यास सांगितले. हा विषय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने, संबंधित अधिकाऱ्याकडे विचारणा केली, त्यांनी सबसिडीचे प्रकरण आमच्याकडे येत नसल्याचे सांगून, सबसिडीच्या तक्रारी वाढल्या असल्याचे सांगितले.
नेमकी सबसिडी गेली कुठे याचा आणखी शोध घेतला असता, या प्रकरणाची लेखी तक्रार गॅस कंपनीच्या विभागीय कार्यालयाकडे केली. त्यांनी या प्रकरणाचा शोधाशोध केला असता, ग्राहकाची सबसिडी त्याच बँकेच्या इतर ग्राहकाच्या खात्यावर जमा झाल्याचे आढळले. हे कसे घडले याचे उत्तर कुणाकडेही नव्हते.