शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद

By admin | Updated: March 3, 2015 01:07 IST

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा : पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाईची आव्वल कामगिरी पुणे : केरळातील त्रिवेंद्रम येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधरण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या विविध गटात महाराष्ट्राच्या १४ सायकलिंगपटूंनी यश संपदान केले असून, पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाई यांनी आपापल्या गटात अव्वल ...


राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा : पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाईची आव्वल कामगिरी

पुणे : केरळातील त्रिवेंद्रम येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधरण उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या विविध गटात महाराष्ट्राच्या १४ सायकलिंगपटूंनी यश संपदान केले असून, पल्लवी धनावडे, मयुर पवार, सचिन देसाई यांनी आपापल्या गटात अव्वल कामगिरी केली आहे.
इंडिव्हिज्युअल परशुट (आयपी), टाईम ट्रायल (टीटी), टीम परशुट (टीपी), टीम स्प्रिंट (टीएस), स्क्रॅच रेस (एसआर) अशा विविध प्रकारात ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या १४ वर्षाखालील गटात पल्लवी धनावडे हिने ५०० मीटर टीटी व २ किलोमीटर आयपी प्रकारात पहिले स्थान पटकावले. शुभम भोसले २ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत दुसरे स्थान मिळविले. स्पर्धेच्या १६ वर्षाखालील गटात मयुर पवार याने ५०० मीटर टीटी व टीएसमध्ये पहिले स्थान मिळविले. सचिन देसाईने ५ किलोमीटर एसआरमध्ये पहिले, २ किलोमीटर आयपीत तिसरे, टीएस प्रकारात पहिले, तर १८ वर्षाखालील गटातील टीपी प्रकारात तिसरे स्थान मिळविले. याच गटातील २ किलोमीटर आयपी प्रकारात अश्विन पाटीलने दुसरे व १८ वर्षाखालील टीपी प्रकारात तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या १८ वर्षाखालील गटात संजय शिंदे याने टीपी प्रकारात तिसरे, प्रफुल्ल शिंदे याने टीपी व १० किलोमीटर एसआर मध्ये तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. अभिषेक अंबादासकर याने दोनशे मीटर एसआरमध्ये दुसरे स्थान राखले.
मुलींमध्ये वैष्णवी गभणे हिने १६ वर्षाखालील २ किलोमीटर आयपीत अव्वल, टीएसमध्ये दुसरे व १८ वर्षाखालील गटात टीपी प्रकारात दुसरे स्थान मिळविले. सुशिकला अगाशे हिने १६ वर्षाखालील ५०० मीटर टीटी, ५ किलोमीटर एसआर व २०० मीटर एसआर मध्ये तिसरे स्थान, तर १८ वर्षाखालील टीपी व टीएसमध्ये दुसरे स्थान पटकावले. मयुरी लुटे हिने १६ वर्षाखालील २ किलोमीटर आयपी, टीएस व १८ वर्षाखालील गटातील टीपी व टीएसमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. रुतुजा सोलाट हिने १८ वर्षरखालील टीपी प्रकारात दुसरे, रुतुजा सातपुतेने वरीष्ठ ४ किलोमीटर अंतराच्या आयपीत तिसरे, तर दिपाली शिलदनकर हिने वरीष्ठ गटातील पॉईंट रेसमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला.
----------------
टी फोल्डरमध्ये २ मार्च सायकलिंग