पत्नीची हत्या करुन रात्रभर तिच्या शेजारी झोपणारा क्रूर पती

By Admin | Updated: June 5, 2016 10:54 IST2016-06-05T10:54:22+5:302016-06-05T10:54:22+5:30

पत्नीची अत्यंत निदर्यतेने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाशी लैंगिक चाळे करणा-या विकृत पतीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Cruel husband lying beside her neighbor overnight after killing his wife | पत्नीची हत्या करुन रात्रभर तिच्या शेजारी झोपणारा क्रूर पती

पत्नीची हत्या करुन रात्रभर तिच्या शेजारी झोपणारा क्रूर पती

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
 
नवी दिल्ली, दि. ५ - पत्नीची अत्यंत निदर्यतेने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाशी  लैंगिक चाळे करणा-या विकृत पतीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शर्मा असे आरोपीचे नाव आहे. मागच्यावर्षी भावाच्या लग्नामध्ये प्रदीपची मोनिकाबरोबर ओळख झाली होती. 
 
पाहताक्षणी तो मोनिकाच्या (२३) प्रेमात पडला होता. प्रदीप प्रेमात पडला तेव्हा तो बरोजगार होता व उड्डाणटप्पू मुलगा अशी त्याची ओळख होती. पण मोनिकाला लग्नासाठी मागणी घातल्यानंतर त्याने सुधरण्याचे आश्वासन दिले होते. लग्न केल्यानंतर दोघे उत्तरप्रदेशमध्ये रहात होते. सहा महिन्यापूर्वी दोघे पती-पत्नी दिल्ली निहार विहार येथे रहायला आले होते. 
 
प्रदीपने दिल्लीत आल्यानंतर ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली होती. मात्र मिळणा-या उत्पनातून खर्च भागत नसल्याने दोघांमध्ये सतत वाद सुरु होते. २९ मे ला ही दोघांमध्ये वाद झाले. संतापलेला प्रदीप बाहेर जाऊन दारुची बाटली घेऊन आला. त्याने मोनिकाला स्वत:सोबत दारु प्यायला सांगितले. पण मोनिका त्याच्याशी वाद घालत होती. 
 
म्हणून संतापलेल्या प्रदीपने विट उचलून मोनिकाच्या डोक्यात मारली. त्याने तीनवेळा प्रहार केला. मोनिकाने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर प्रदीपने तिचे भिंतीवर डोके आपटण्यास सुरुवात केली. मोनिकाची हालचाल थांबल्यानंतर त्याने तिचा मृतदेह स्नानगृहात नेला. तिथे मृतदेहाला आंघोळ घातल्यानंतर त्याने बेडवर आणून मृतदेह ठेवला व लैंगिक चाळे केले. त्यानंतर संपूर्ण रात्र मृतदेहाच्या शेजारी झोपून काढल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दहावाजता त्याला जाग आली. 
 
त्यानंतर प्रदीप स्वत:चा व मोनिकाचा मोबाईल घेऊन तिथून पसार झाला. पोलिसांना दुस-यादिवशी हत्या झाल्याची माहिती मिळाली. फरार असलेल्या प्रदीपला पोलिसांनी शनिवारी नानग्लोई येथून अटक केली. 
 

Web Title: Cruel husband lying beside her neighbor overnight after killing his wife