शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे वार्ता

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

त्रिमूर्तीनगरात महिलेचे मंगळसूत्र पळविले

त्रिमूर्तीनगरात महिलेचे मंगळसूत्र पळविले
नागपूर : त्रिमूर्तीनगर एनआयटी लेआऊट येथील रहिवासी प्रणिता बाबासाहेब गुडधे (६०) एका खासगी कामानिमित्त जात होत्या. एनआयटी लेआऊट येथील श्रीहरी अपार्टमेंटजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्याला थाप मारून मंगळसूत्र व सोन्याची कंठीमाळ पळवून नेली. जवळपास दीड लाख रुपयांचा हा मुद्देमाल होता. हे दोनही इसम २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण करून सोन्याची चेन हिसकावली
नागपूर : राणी दुर्गावती चौक येथील रहिवासी जुबेर शेख ऊर्फ नाशीर शेख (२७) हे आपल्या जरीपटका येथील चिकन सेंटरमध्ये असताना, आरोपी संतोष सीताराम शाहू (३६) रा. पाटणकर चौक याने जुबेर शेख याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलीला पळविले
नागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यशोदा पब्लिक स्कूल समोरून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपींनी पळवून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांनी नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नागपूर : हनुमानमंदिर, रेल्वेलाईन रोड, जरीपटका येथे राहणारा अजय भीमराव गवई (२६) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राज वैष्णव याने दिलेल्या सूचनेनुसार जरीपटका पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.