शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! पती, सासूच्या टोमण्याला वैतागून 'तिने' टोकाचे पाऊल उचलले; केले असे काही की पोलीसही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 15:29 IST

Crime News : पती-पत्नीमध्ये कधी कधी भांडणं विकोपाला जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पती, सासूच्या टोमण्याला वैतागून पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच विविध गोष्टींवरून भांडणं होत असतात. कधी कधी ही भांडणं विकोपाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पती, सासूच्या टोमण्याला वैतागून पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी बायकोने स्वतःच्याच घरात डल्ला मारला असून आपल्या भावासोबत कट रचला आहे. महिलेने आपल्या एका भावाच्या मदतीने घरातच चोरी केल्याचं तपासात उघड झाले असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डमधून या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिलेकडे जवळपास 78 हजार 300 रुपये रोख रक्कम, सोन्याचा हार, अंगठीसह अन्य काही दागिने सापडले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीला धडा शिकवण्यासाठी महिलेने स्वतःच्याच घरात चोरी केली आहे. दिल्लीच्या द्वारका परिसरात गोपाळ नगरमध्ये ही घटना घडली होती. रवी हा आपल्या कुटुंबीयासोबत राहतो. घरातून रोकड आणि दागिन्यांची चोरी झाल्याची तक्रार त्याने पोलिसांत दिली होती. बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून चोरीचा घटनेचा उलगडा केला. पोलिसांनी तपासादरम्यान, घराच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले. तसेच तांत्रिक मदतही घेतली.  

नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी बायकोने स्वतःच्याच घरात मारला डल्ला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयास्पद पद्धतीने नजफगढ येथून द्वारका वळणापर्यंत रिक्षातून गेल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने महत्वाची माहिती दिली. दरम्यान, तांत्रिक मदत आणि कॉल डिटेल्स तपासल्यानंतर संशयित हा तक्रारदाराच्या पत्नीच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. चौकशी केली असता ती संशयित व्यक्ती पत्नीचाच भाऊ असल्याचं समोर आलं. त्यानंतर संशयावरून पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

भावासोबत 'असा' रचला कट

पतीसोबत खूश नव्हते. पती आणि सासू नेहमीच टोमणे मारायचे. त्यांना धडा शिकवण्यासाठी चुलत भाऊ गिरीराज याच्यासोबत घरातच चोरी करण्याचा कट आखला. घटनेच्या दिवशी त्याला बोलावून घेतले. गिरीराजने घरात चोरी केली. रोकड आणि दागिने घेऊन तो पसार झाला. आरोपी हा राजस्थानमधील दौसा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीकडून 78 हजार 300 रुपये आणि सोन्याचे दागिने जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस