शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगाचे दोन उमेदवारांवर गुन्हे

By admin | Updated: October 6, 2014 03:56 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटला आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असताना एकमेकांवर विखारी टीका केली जात आहे. तरीही आदर्श आचारसंहिता जपण्याचे काम मुंबईच्या उमेदवारांनी केले आहे.गेल्या २४ दिवसांत मुंबई शहरात एकाही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ दिवसांत मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत केवळ २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही गुन्हे भायखळा विधानसभा मतदारसंघात दाखल झालेले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे दोन्ही ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले आहेत, त्या पक्षाचा उमेदवार या मतदारसंघात नाही. दरम्यान, दाखल गुन्ह्यांपैकी पहिला गुन्हा २४ सप्टेंबर रोजी एआयएमआयएम पक्षाचे आमदार आमिर इद्रीस अकबरूद्दीन ओवेसी यांच्याविरोधात दाखल झाला आहे. नागपाडा येथे विनापरवानगी जाहीर सभा घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा गुन्हा शिवसेनेच्या गणेश महांगरे यांच्यावर नोंद झाला आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र असलेले पोस्टर विनापरवानगी लावल्याप्रकरणी पालिकेने गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)