मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार्‍या महिलेवर गुन्हा

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:38+5:302015-09-07T23:27:38+5:30

सोलापूर : रविवारी सोलापूर दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्‍हाणी मांडणार्‍या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (वय 41, रा. स्वामी विवेकानंद नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

Crime against women affected by Chief Minister | मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार्‍या महिलेवर गुन्हा

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार्‍या महिलेवर गुन्हा

लापूर : रविवारी सोलापूर दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून आपली गार्‍हाणी मांडणार्‍या महिलेवर सदर बझार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भारती सायबण्णा कोळी (वय 41, रा. स्वामी विवेकानंद नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
मोहोळ आणि अक्कलकोट येथील तलावांची पाहणी करून मुख्यमंत्री विमानतळावर आले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई आढावा बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी मोटारीने येत होते. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुख्यमंत्र्यांचा ताफा येताच भारती कोळी मध्ये आल्या. दरम्यान, तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिला पोलीस शिपाई अनिला बाबू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तपास हवालदार सय्यद करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against women affected by Chief Minister