शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
5
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
6
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
7
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
8
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
9
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
10
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
11
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
12
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
13
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
14
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
16
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
17
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
18
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
20
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टेस्ट करायला गेले सरपंच, नाकात टाकताच स्वॅब स्टिक तुटली; पुढे घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 13:23 IST

ग्रामस्थ चाचणीसाठी तयार नसल्यानं सरपंचांनी घेतला पुढाकार; नाकात स्वॅब स्टिक तुटल्यानं रुग्णालयात दाखल करण्याची वेळ

करीमनगर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. कोरोना चाचणी, उपचार, लसीकरण याबद्दल अद्यापही लोकांच्या मनात गैरसमज आहेत. हेच गैरसमज दूर करण्यासाठी तेलंगणातील एका सरपंचानं पुढाकार घेतला. मात्र हा पुढाकार त्यांना भलताच महागात पडला.

तेलंगणातील करीमनगर येथील व्यंकटरोपल्ली गावचे सरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी गेले होते. गावात होत असलेल्या अँटिजन चाचणीत कोणीच सहभागी होत नसल्यानं शेखर यांनी पुढाकार घेतला. इतर ग्रामस्थांनी कोरोना चाचणी करून घ्यावी यासाठी ते पुढे सरसावले. मात्र या कोरोना चाचणीमुळे शेखर अडचणीत आले. 

शेखर कोरोना चाचणी करून घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर पोहोचले. आरोग्य कर्मचाऱ्यानं नमुना गोळा करण्यासाठी त्यांच्या नाकात स्वॅब स्टिक घातली. मात्र ती नाकातच मोडली गेली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी  स्वॅब स्टिक काढण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. अखेर शेखर यांना करीमनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे एंडोस्कोपीच्या माध्यमातून स्वॅब स्टिक काढण्यात आली. स्वॅब स्टिक तुटून शेखर यांच्या गळ्यात जाऊन अडकली. ती काढण्यासाठी एंडोस्कोपी करावी लागली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या