शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनातून कौशल्य विकास नागपुरात होणार केंद्र: रोजगाराबाबत मार्गदर्शन

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नागपूर: युवकांची शैक्षणिक पात्रता, बौद्धिक क्षमता,त्याचा कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराची संधी लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

नागपूर: युवकांची शैक्षणिक पात्रता, बौद्धिक क्षमता,त्याचा कल आणि बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराची संधी लक्षात घेऊन त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकासावर अधिक भर दिला असून राज्याचे रोजगार व स्वयंरोजगार खात्याकडेच कौशल्य विकासाचे काम सोपवण्यात आले आहे. या निमित्ताने प्रथमच खात्याला पूर्णवेळ सचिव मिळाले आहेत. कौशल्य विकासाकरिता युवकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी राज्यातील पाच जिल्ह्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार असून त्यात नागपूरचाही समावेश आहे. तरुणांकडे पदवी असली तरी कौशल्याचा अभाव असल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा त्यांना फायदा होत नाही. एकीकडे रोजगार असूनही त्यासाठी पात्र मनुष्याचा अभाव तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असे परस्पर विरोधी चित्र आहे. ते बदलण्यासाठी कौशल्य विकासाला महत्त्वाचे स्थान आहे. युवकांची शैक्षणिक पात्रता आणि बाजारात उपलब्ध असलेली रोजगाराची संधी याची सांगड घालून त्यांच्यातील कौशल्याचा विकास करण्यासाठी पुढच्या काळात भर देण्यात येणार आहे. समुपदेशन केंद्रातून याच बाबीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या केंद्रासाठी यासाठी आवश्यक त्या साहित्याच्या खरेदीलाही मंजुरी मिळाली आहे. दरम्यान स्थानिक रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केलेल्या युवकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याचा मोठ्या प्रमाणात लाभ युवक व युवती घेत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)