Cough Syrup : हृदयद्रावक! कफ सिरपमुळे आणखी २ मुलांनी गमावला जीव; मृतांचा आकडा २२ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:36 IST2025-10-09T13:35:04+5:302025-10-09T13:36:51+5:30
Cough Syrup : किडनी इन्फेक्शनमुळे आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू होत आहे. किडनी इन्फेक्शनमुळे आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. छिंदवाडा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी धीरेंद्र सिंह नेत्री यांनी गुरुवारी याची पुष्टी केली.
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ वर्षीय विशालचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला आणि ४ वर्षीय मयंक सूर्यवंशीचा काल रात्री महाराष्ट्रातील नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही मुलं छिंदवाडा येथील पारसिया शहरातील रहिवासी होती. मृतांची संख्या आता २२ वर पोहोचल्याचं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
"पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
मध्य प्रदेश पोलिसांनी या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केलं आहे आणि कोल्ड्रिफच्या तामिळनाडूतील उत्पादकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पारसिया उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र सिंग जाट यांनी पीटीआयला सांगितलं की, भेसळयुक्त कफ सिरप प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी चेन्नई येथून तामिळनाडू येथील श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अटक केली.
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
पोलिसांनी औषध कारखानाही सील केला आहे. आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी चेन्नई न्यायालयात हजर केलं जाईल आणि शुक्रवारपर्यंत पारसियाला आणलं जाईल. या आठवड्याच्या सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारने मुलांच्या मृत्यूच्या चौकशीदरम्यान दोन औषध निरीक्षक आणि अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) चे उपसंचालक निलंबित केले आणि राज्याच्या औषध नियंत्रकाची बदली केली.