शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला शशी थरुरांचे उत्तर; म्हणाले, 'मिस्टर राष्ट्राध्यक्ष....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:37 IST

CoronaVirus :भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत.

 नवी दिल्ली : अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. दहा हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची मागणी केली आहे. मात्र, भारताने या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. यावर, भारताने हे निर्बंध मागे घेतले नाही, तर कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. यावरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

शशी थरुर यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. ते म्हणाले, "जागतिक मुद्द्यांच्याबाबतीत माझ्या दशकांच्या अनुभवात मी कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्ष किंवा सरकारला दुसर्‍या देशाच्या सरकारला उघडपणे धमकी देताना ऐकले नाही. मिस्टर राष्ट्राध्यक्ष? ज्यावेळी भारत आपल्याला हे औषध विकण्याचा निर्णय घेते, त्यावेळी आपल्यासाठी हा पुरवठ्याचा विषय होईल. भारतात जी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन तयार केली जाते, ती भारताच्या पुरवठ्यासाठी आहे."

भारत आणि अमेरिकेच्या उत्तम व्यापारी संबंधांचा संदर्भ देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील निर्बंध उठवले जातील, अशी आशा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केली. तसेच, भारताने निर्बंध न उठवल्यास कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प  यांनी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मागितले होते. मलेरियासारख्या आजाराचा सामना करण्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन उपयुक्त आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करतानाही हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मोठी मदत होते. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका