शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

"पंतप्रधानांची बहीण आहे; आवाज कडक असणारच ना!"... 90 वर्षीय ताईचं मोदींना 'कडक' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 6:47 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेत्यांची, जुन्या सहकाऱ्यांचीही फोनवरून विचारपूस करत आहेत.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. काही ज्येष्ठ नेत्यांची, जुन्या सहकाऱ्यांचीही मोदी फोनवरून विचारपूस करत आहेत.पंतप्रधान मोदींनी त्यांना बहिणीसमान असलेल्या कमला वर्मांसोबत पाच मिनिटं गप्पा मारल्या.

कोरोना व्हायरसविरोधातील लढाई अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. जगातील अनेक देशांच्या तुलनेत, कोरोना व्हायरस पसरण्याचा वेग भारतात बराच कमी आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आपण यशस्वी ठरत आहोत. जनतेनं दाखवलेल्या संयमाचं, जिद्दीचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. त्याचवेळी केंद्र सरकार आणि सर्वच राज्य सरकारंही या संकटाचा धैर्यानं मुकाबला करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. त्या-त्या ठिकाणची परिस्थिती जाणून घेत आहेत. त्यासोबतच, काही ज्येष्ठ नेत्यांची, जुन्या सहकाऱ्यांचीही फोनवरून विचारपूस करत आहेत. त्यात त्यांनी आज आपल्या एका मानलेल्या बहिणीला फोन केला होता.

मोदींनी विचारलं, माझा राग येत असेल ना?... पुण्यातील महिला सरपंचांचं 'लय भारी' उत्तर 

कोरोना हरणार, देश जिंकणार! 'या' राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

डॉ. कमला वर्मा... जनसंघ, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या... जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांमध्ये भाजपाचा प्रचार-प्रसार करणाऱ्या नेत्या... हरियाणा प्रदेश भाजपाच्या पहिल्या महिला अध्यक्ष... तीन वेळा हरियाणाच्या कॅबिनेटमंत्री... सध्याचं वय 90 वर्षं... गुजरातमध्ये त्यांनी निवडणूक प्रचारही केला होता... त्याची आठवण काढत मोदींनी कमला वर्मांसोबत पाच मिनिटं गप्पा मारल्या. 

(PC: पंजाब केसरी)

''पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आल्याचं कळताच मी चकित झाले. माझा आवाज ऐकून ते म्हणाले, बहिणीचा आवाज आजही कडक आहे. त्यावर मी म्हटलं, पंतप्रधानांची बहीण आहे, आवाज कडक असणारच ना'', असं सांगताना कमलाताईंच्या आवाजात वेगळाच आनंद जाणवत होता. हरियाणाला येईन तेव्हा भेटायला येतो, असंही मोदींनी त्यांना आवर्जून सांगितलं.

नरेंद्र मोदींचा १०६ वर्षीय माजी आमदाराला फोन, कोरोनावर मात करण्यासाठी मागितला आशीर्वाद!

संकटकाळात नरेंद्र मोदींचा जुन्या सहकाऱ्याला फोन; ५ मिनिटांचा ‘असा’ भावनिक क्षण!

यमुनानगरमध्ये लॉकडाऊनला जनतेकडून प्रतिसाद मिळतोय, केंद्राकडून आलेल्या सूचना आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती यावेळी कमला वर्मा यांनी पंतप्रधान मोदींना दिली. आपल्या कामाचं जगभरातून होत असलेलं कौतुक पाहून अभिमान वाटतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. तेव्हा, संपूर्ण भारत एक होऊन ही लढाई लढत असल्यानं विजय आपलाच होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा

कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

जगन्नाथ पाटील यांनाही केला फोन 

राज्याचे माजी मंत्री आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार जगन्नाथ पाटील यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच फोन केला होता. कुटुंबीयांची ख्याली खुशाली विचारून काळजी घेण्याचं आस्थेवाईक आवाहन त्यांनी केलं होतं. 

भारतीय जनसंघाचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते सीताराम बागडी यांचीही नरेंद्र मोदींनी फोन करून विचारपूस केली. दोघांनी सुमारे पाच मिनिटे चर्चा केली. बाबा कुंडी येथील रहिवासी सीताराम बागडी सध्या हरियाणा अनुसूचित जाती महामंडळाचे संचालक आहेत. या फोनमुळे बागडी भावूक झाले होते.

तसंच, कुशीनगर जिल्ह्यातील 106 वर्षीय माजी आमदार नारायण, गुजरातमधील 99 वर्षीय माजी आमदार रतनभाई थम्मर यांच्याशीही पंतप्रधान मोदींनी फोनवरून संवाद साधला होता.

मोठा दिलासा! आजपासून इतर दुकानेही उघडणार; शॉपिंग मॉल, कॉम्प्लेक्स बंदच राहणारजाणून घ्या, कुठे आणि कोणती दुकाने उघडण्याची परवानगी?; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी