CoronaVirus: कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 03:54 AM2020-04-25T03:54:27+5:302020-04-25T06:56:51+5:30

गावे सक्षम करण्याचे आवाहन

CoronaVirus taught the importance of self sufficiency says pm modi while interacting with sarpanch | CoronaVirus: कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

CoronaVirus: कोरोनाने स्वयंपूर्ण होण्याचे महत्त्व शिकवले; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सरपंचांशी संवाद

Next

नवी दिल्ली : कोरोनामुळे जग बदलेल. बदलेल्या जगासोबत आपल्याला गावे सक्षम करावी लागतील. स्वयंसिद्ध स्वयंपूर्णता हाच कोरोनाचा सर्वात मोठा धडा आहे. त्यामुळे आपल्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावे लागेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भारतासाठी दिला. कोरोनाला रोखण्यासाठी दोन फूट अंतर हाच प्रभावी उपाय असल्याचे सांगून मोदींनी फिजिकल डिस्टन्सिंगची सोपी व्याख्या केली. राष्ट्रीय पंचायत दिनी पंतप्रधानांनी देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. लॉकडाऊनची परिस्थिती, गावकऱ्यांचे अनुभव त्यांनी जाणून घेतले.

सार्वजनिक सेवा केंद्रामुळे गावकऱ्यांची सोय झाली. तात्काळ मदत मिळू लागली. कधीकाळी केवळ १०० ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड होते. आता भारतनेट योजनेमुळे सव्वा लाखांपेक्षा जास्त ग्रामपंचायती इंटरनेटशी कनेक्ट होतात, असेही पंतप्रधानांनी सांगितले. ई- ग्राम स्वराज पोर्टलचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. गावागावांतील विकासकामांची माहिती त्यावर अपडेट करण्यात येईल. ई-स्वराज पोर्टलमुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येईल.

काय म्हणाले मोदी?
आपल्या कामाची पद्धत बदलली आहे. संपर्क येणार नाही ही नवी कामाची व्यवस्था उभारावी लागेल. गावाने संघटित व्हावे. प्रत्येक शेतकºयाने, गावकºयाने स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
तुम्हाला सुरक्षित राहावेच लागेल. लॉकडाऊन असला तरी देशभरात धान्य, दूध, दही, फळ, भाजीपाल्याची कमतरता शेतकºयांनी भासू दिली नाही. ग्रामीण भागाने संकटकाळी मोठी मदत केली आहे. आधी (काँग्रेसच्या काळात) दिल्लीहून निधी पाठविल्यास ग्रामीण भागात केवळ १५ पैसे पोहोचायचे.
गावागावांत लॉकडाऊनचे प्रभावी पालन होत आहे. गावातून मिळणारी माहिती माझ्यासाठी प्रेरणादायी असल्याचेही मोदींनी आवर्जून सांगितले.
आता पूर्ण १०० पैसे पोहोचतात. कोरोना विषाणू न बोलावता कुणाच्याही घरी जात नाही. त्यामुळे घराबाहेर पडून कोरोनाला आमंत्रण देऊ नका.

Web Title: CoronaVirus taught the importance of self sufficiency says pm modi while interacting with sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.