Coronavirus : पंतप्रधान मोदींच्या 'लॉकडाऊन' भाषणाने मोडले सर्व रेकॉर्ड, तब्बल इतक्या लोकांनी पाहिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 04:01 PM2020-03-28T16:01:37+5:302020-03-28T16:09:09+5:30

Coronavirus : लॉकडाऊनची घोषणा करणारं भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिलं गेलं आहे.

Coronavirus pm modi speech on corona lockdown breaks all record SSS | Coronavirus : पंतप्रधान मोदींच्या 'लॉकडाऊन' भाषणाने मोडले सर्व रेकॉर्ड, तब्बल इतक्या लोकांनी पाहिलं

Coronavirus : पंतप्रधान मोदींच्या 'लॉकडाऊन' भाषणाने मोडले सर्व रेकॉर्ड, तब्बल इतक्या लोकांनी पाहिलं

Next

नवी दिल्ली :चीनच्या वुहान शहरातून वेगाने पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्य देशात शिरकाव केला. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 27,370 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 5,97,458 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 1,33,373 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.

जान है तो जहान है... असं म्हणत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. नाही तर देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या भाषणाने सर्व भाषणांचे रेकॉर्ड तोडल्याची माहिती समोर आली आहे.लॉकडाऊनची घोषणा करणारं भाषण टीव्हीवर सर्वात जास्त पाहिलं गेलं आहे. टीव्ही रेटिंग एजन्सी ब्रॉडकास्टिंग ऑडियन्स रिसर्च काउंसिल्स (BARC) ने याबाबत महिती दिली आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विट करून याबाबत सांगितलं. आयपीएलचा फायनल सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षाही जास्त लोकांनी मोदींचं हे भाषण पाहिलं आहे. मोदींचं भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिलं तर आयपीएलचा फायनल सामना 13.3 कोटी लोकांनी पाहिला होता.

‘बार्क इंडियाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 24 मार्च रोजी लॉकडाऊनसंदर्भात केलेले भाषण टिव्हीवर सर्वाधिक पाहिलं गेलं आहे. त्याच्या तुलनेत आयपीएलचा अंतिम सामना पाहणाऱ्यांची संख्याही मागे पडली आहे. हे भाषण सुमारे 201 चॅनलवर दाखविण्यात आले’ असं ट्विट शशी शेखर यांनी केलं आहे. बीएआरसीच्या रेटिंगनुसार पंतप्रधानांचे 19 मार्चचे जनता कर्फ्यूचे भाषण 191 टिव्ही चॅनेल्सवर दाखविण्यात आले होते, ते 8.30 कोटी लोकांनी पाहिले. तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जेव्हा पंतप्रधानांनी कलम 370 रद्द करण्याबाबत भाषण केले तेव्हा ते 163 वाहिन्यांवरुन 6.5 कोटी जनतेने पाहिले. तर 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा 114 वाहिन्यांवरुन 5.7 कोटी लोकांनी पाहिले होते. त्यानंतर मोदींचं लॉकडाऊन भाषण 19.7 कोटी लोकांनी पाहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले, डाळींनी ओलांडली शंभरी

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू

Coronavirus : कोरोना अलर्ट! ‘या’ धोकादायक वेबसाईटवर चुकूनही करू नका क्लिक

Coronavirus : धक्कादायक! ‘कोरोना पसरवूया’, इंजिनिअरच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टने खळबळ

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

 

Web Title: Coronavirus pm modi speech on corona lockdown breaks all record SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.