Coronavirus 5 persons died and 6 injured in accident in Telangana sss | Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

हैदराबाद - भारतात शुक्रवारी (मार्च) आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्यांची संख्या 20 वर पोहोचली असून संसर्गित रुग्णांची संख्या 879 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत नवीन 75 रुग्ण आढळले. भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. याच दरम्यान तेलंगणातील शमशाबादमध्ये एक भीषण अपघात आहे. या अपघातात5 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. कोरोना व्हायरसमुळे काही काम नसल्याने आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील शमशाबाद येथे मिनी ट्रक आणि लॉरीचा भीषण अपघात झाला. अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मजुरांना काम नाही. मिनी ट्रकमधून जवळपास 30 मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत होते. यावेळी ट्रकचा भीषण अपघात झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

'भारतीय अर्थव्यवस्था भक्कम', पतधोरणाबाबत समितीने घेतले एकमताने निर्णय

सेवा देण्यास स्पाईसजेट तयार, मजुरांसाठी मुंबई व दिल्लीहून काही उड्डाणे करण्याची तयारी

 

Web Title: Coronavirus 5 persons died and 6 injured in accident in Telangana sss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.