CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 08:50 AM2020-03-28T08:50:00+5:302020-03-28T09:37:00+5:30

 कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

CoronaVirus : coronavirus india summer heat temperature covid 19 mit report vrd | CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

CoronaVirus : भारताची कोरोनापासून लवकरच मुक्तता?; शास्त्रज्ञांना दिसला आशेचा किरण!

Next
ठळक मुद्देशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार जगालाही दिलासा मिळू शकतो. उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं आहे.  कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत.उन्हाळ्यात तापमानाचा पारा आणखी चढणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगातले विकसित देशही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अमेरिका, इटली, स्पेन आणि जर्मनीसारख्या देशात मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याचदरम्यान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार जगालाही दिलासा मिळू शकतो. उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे, असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं आहे.  कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी शक्य तितके प्रयत्न केले जात आहेत. परंतु मोसमातील बदल हासुद्धा कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

जगातल्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आणि संस्थांनी केलेल्या अभ्यासानुसार, थंडी जाईल आणि वातावरणात बदल होईल. उन्हाळ्यात तापमानाचा पारा आणखी चढणार असून, कोरोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार आहे. भारतात तापमानाचा पारा खाली असला तरी लवकरच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे कोरोनापासून मुक्तता मिळण्याच्या आशा वाढल्या आहेत. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एमआयटीनंही भारतात सकारात्मक बदल दिसेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

एमआयटीच्या अहवालातून भारताला दिलासा 
या संस्थेच्या नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार जर हवामान उष्मा आणि आर्द्रतेने भरलेले असेल तर कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता खूप कमी होईल. ज्या देशात तापमान ३ ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान आहे आणि आर्द्रता प्रति घनमीटर ४ ते ९ ग्रॅम आहे, तेथे कोरोना विषाणूचे ९० टक्के रुग्णं आढळले आहेत. ज्या देशांमध्ये पारा १८ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त होता आणि आर्द्रता प्रति घनमीटरपेक्षा ९ ग्रॅमपेक्षा जास्त होती, तिकडे ६ टक्केच रुग्ण आढळले आहेत. एमआयटीचा हा अहवाल दिलासा देणारा आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या काही दिवसांत भारतातील तापमानात वाढ होणार आहे.

स्वतः अमेरिकेनं दोन क्षेत्रांमधील फरक केला अधोरेखित
अमेरिकेतच अभ्यासाअंती उष्ण आणि थंड भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगवेगळा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या उत्तरी राज्यांत, थंडी अधिक आहे, तिथे कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत.  दक्षिणेकडील राज्य थोडी उष्ण असल्यानं उत्तरी राज्यांच्या तुलनेत इथे कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. या संशोधनात असेही म्हटले आहे, की भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव उबदार हवामानामुळे खाली आला आहे. चीन, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत हे देश दाट लोकवस्तीचे आहेत आणि आरोग्य सुविधा बरीच कमकुवत आहे. जेव्हा भारतातील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हा पंतप्रधान मोदींनी कोरोना रोखण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली. आपल्याला सामाजिक अंतर ठेवावे (सामाजिक डिटेनिंग) लागेल, असंही मोदींनी अधोरेखित केलं आहे. कारण सोयीसुविधा असलेले विकसित देशसुद्धा याविरुद्ध काहीही करू शकले नाहीत.

उष्णता भारतासाठी ठरणार निर्णायक
भारत आणि अमेरिकेच्या सर्व देशांमध्ये कोरोनानं जो काही धुमाकूळ घातलेला आहे. त्यातही भारताला दिलासा देणाऱ्या घटना घडत आहेत. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचे प्रमाणही कमी आहे आणि मृतांचा आकडादेखील कमी आहे, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. अशा परिस्थितीत एमआयटीचा अहवाल बाहेर आल्यानं भारताला हा मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाळा आल्यानंतर लोक उष्म्यानं कंटाळतात. पण यंदाच्या उन्हाळ्याचं कोरोनाला थोपवण्यासाठी स्वागत करूया, कारण हा उन्हाळाचा कोरोनासाठी काळ ठरणार आहे. 

Web Title: CoronaVirus : coronavirus india summer heat temperature covid 19 mit report vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.