शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: आम्ही कोरोनावर कोणतंही औषध तयार केलं नाही; पतंजलीचा यू-टर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 13:02 IST

उत्तराखंड सरकारनं पाठवलेल्या नोटिशीला पतंजलीचं उत्तर; कोरोनिलवरून कोलांटउडी

नवी दिल्ली: कोरोनाच्या उपचारासाठी तयार केलेल्या कोरोनिल औषधावरून आता पतंजलीनं यू-टर्न घेतला आहे. आम्ही कोरोनावरील कोणतंही औषध तयार केलं नसल्याचा दावा पतंजलीनं केला आहे. उत्तराखंड सरकारच्या आयुष विभागाकडून पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली होती. त्या नोटिशीला दिलेल्या उत्तरात पतंजलीनं कोरोनावर कोणतंही औषध तयार केलंच नसल्याचा दावा केला. काही दिवसांपूर्वीच योगगुरू रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी कोरोनिल औषधाचं लॉन्चिंग करण्यात आलं होतं.कोरोनावर औषध शोधल्याचा दावा करत रामदेव बाबांनी कोरोनिल लॉन्च केलं. मात्र हे औषधं, त्यासाठी आवश्यक परवाना यावरून रामदेव बाबा अडचणीत सापडले. उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं पतंजलीला नोटीस पाठवली. त्यानंतर रामदेव बाबांनी कोलांटउडी घेतली. 'आम्ही कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केलाच नव्हता. कोरोना रुग्ण बरे होतील, असं औषध तयार केल्याचं आम्ही म्हटलं होतं,' असं स्पष्टीकरण पतंजलीकडून उत्तराखंड सरकारला देण्यात आलं आहे. आम्ही कधीही कोरोनावरील औषधं तयार केल्याचा दावा केला नव्हता, असं पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटलं. आम्ही सरकारच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन औषध तयार केलं. त्या औषधामुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले. आमच्या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होतात, असा दावा आम्ही केला होता. त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. या प्रकरणी उत्तराखंड सरकारच्या आयुष मंत्रालयानं दिलेल्या नोटिशीला आम्ही उत्तर दिलं आहे, असं बाळकृष्ण यांनी सांगितलं.२३ जूनला पतंजली आयुर्वेदनं राजस्थानच्या निम्स विद्यापीठासोबत कोरोनाचं औषध तयार केल्याचा दावा केला. या औषधाला कोरोनिल आणि श्वासारी वटी असं नाव देण्यात आलं. रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण आणि निम्स विद्यापीठाच्या संचालकांच्या उपस्थितीत हरिद्वारमध्ये कोरोनिल लॉन्च करण्यात आलं. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचा दावा रामदेव बाबांनी केला होता.कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

"बाबा रामदेव यांच्याकडे प्रत्येक आजारावर औषध, ते मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतात’’ कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBaba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली