शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 168 वर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 5:28 AM

देशामधील कोरोना रुग्णांची संख्या १68 झाली असून, त्यामध्ये अनेक विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतीय लष्करामध्ये करोना विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. लडाख स्काउट रेजिमेंटमधील एक लष्करी जवान (३४ वर्षे) कोरोनाग्रस्त झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध राज्यांत कोरोनाचे १० नवे रुग्ण आढळले असून, त्यामुळे देशात विषाणूचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या बुधवारी 168 वर पोहोचली आहे. बुधवारी रात्री तेलंगणामध्ये 7 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दरम्यान,  एका कोरोनाबाधिताने नवी दिल्लीत आत्महत्या केली आहे.करोनाग्रस्त झालेला लष्करी जवान लेहमधील चुहोट गावचा रहिवासी आहे. त्याचे वडील इराणच्या यात्रेहून २० फेब्रुवारीला भारतात परतले होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले. लडाख हार्ट फाउडेशनच्या क्वारंटाइनमध्ये हलविण्याआधी ते आपल्या कुटुंबीयांना भेटले होते. त्यावेळी या जवानालाही वडिलांकडून कोरोनाचा संसर्ग झाला. हा जवान २५ फेब्रुवारीपासून रजेवर होता. तो २ मार्च रोजी कामावर रुजू झाला. या जवानाला ७ मार्च रोजी क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे १६ मार्च रोजी वैद्यकीय तपासणीतून सिद्ध झाले.देशामधील कोरोना रुग्णांची संख्या १68 झाली असून, त्यामध्ये 31 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या साथीने देशात ३ जणांचा बळी घेतला असून, त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकमधील कोरोनाच्या रुग्णांचा समावेश आहे. बंगळुरूमध्ये कोरोनाचे आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे कर्नाटकातील अशा प्रकारच्या रुग्णांची एकूण संख्या १३ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिली.नॉर्वेचा गोव्यातील नागरिक करोनाग्रस्त नाहीनॉर्वे देशातील एक नागरिक गोव्यात आला असून, त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे वैद्यकीय चाचणीत आढळून आले आहे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी बुधवारी सांगितले.या नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा दूरध्वनी एका माणसाने केला. रक्ताचे नमुने तपासण्यासाठी दिलेल्या प्रयोगशाळेतून बोलत असल्याची बतावणी हा दूरध्वनी करणाऱ्याने केली होती. गोव्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी काही खाटा राखीव ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना दिले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नावांची व्यवस्थित नोंद ठेवण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत