शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CoronaVirus News: देशात २२१ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:11 AM

सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजारांपर्यंत खाली घसरली असून गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

नवी दिल्ली : गेल्या चोवीस तासांत देशामध्ये कोरोनाचे १३ हजार ५९६ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ४० लाखांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ८९ हजारांपर्यंत खाली घसरली असून गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे १६६ जणांचा बळी गेला असून मृतांची संख्या ४ लाख ५२ हजार २९० झाली आहे. मागील चोवीस दिवसांत कोरोनाच्या नव्या रुग्णांचे दररोज आढळणारे प्रमाण ३० हजारांपेक्षा कमी आहे. तर गेल्या सलग ११३ दिवसांत रोज कोरोनाचे ५० हजारांपेक्षा कमी नवे रुग्ण सापडत आहेत. एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचार घेत असलेले रुग्ण ०.५६ टक्के आहेत. कोरोनातून आजवर ९८.१२ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी नव्या रुग्णांच्या संख्येत ६,१५२ जणांची घट झाली. देशात ३ कोटी ४० लाख ८१ हजार ३१५ कोरोना रुग्ण असून त्यातील  ३ कोटी ३४ लाख ३९ हजार ३३१ जण बरे झाले. कोरोनाचा दररोजचा संसर्ग दर १.३७ टक्के असून मागील ४९ दिवसांत तो तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा आठवड्याचा संसर्ग दर १.३७ टक्के असून तो सलग ११५ दिवसांपासून तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.३३ टक्के आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना लसींचे ९८ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले. तर ५९ कोटी १९ लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत. जगभरात कोरोनाचे २४ कोटी रुग्णजगभरात कोरोनाचे २४ कोटी १५ लाख रुग्ण आहेत. त्यातील २१ कोेटी ८७ लाख जण बरे झाले व ४९ लाख लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेत ४ कोटी ५७ लाख रुग्ण असून ३ कोटी ५३ लाख जण या संसर्गातून बरे झाले. अमेरिकेत कोरोनामुळे ७ लाख ४४ हजार, ब्राझिलमध्ये ६ लाख ३ हजार जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या