शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
13
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
14
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
15
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट, ८० डॉक्टर पॉझिटिव्ह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:00 IST

CoronaVirus News: कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील या सरोज हॉस्पिटलमध्ये आता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत सरोज हॉस्पिटलमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या हॉस्पिटलमधील जवळपास ८० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ( CoronaVirus : delhi corona saraoj hospital doctors covid positives, opd closed)

दिल्लीतील या सरोज हॉस्पिटलमध्ये आता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. एके रावत यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना संकटात ही चिंताजनक बाब आहे की, इतके डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

(Corona Vaccine: खासगी रुग्णालयांमध्ये सर्वात महाग मिळतेय कोरोनाची लस, जाणून घ्या किंमत...)

दरम्यान, राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. तर दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह आजपासून मेट्रो सेवाही बंद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, हा लॉकडाऊन उद्या १० मे रोजी संपणार आहे. परंतू दिल्लीतील कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. तसेच, लॉकडाऊनचा परिणाम चांगल दिसून येत आहे. २६ एप्रिलनंतर कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना संक्रमणाचा दर ३० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आल्याचेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टर