CoronaVirus News: कोरोनामुक्त झाल्यावर जाऊ शकते दृष्टी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 02:39 PM2021-06-13T14:39:37+5:302021-06-13T14:41:23+5:30

CoronaVirus News: 'लाँग कोविड'मधून जात असलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती

CoronaVirus News decoding long covid can corona patients have vision loss after recovery | CoronaVirus News: कोरोनामुक्त झाल्यावर जाऊ शकते दृष्टी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News: कोरोनामुक्त झाल्यावर जाऊ शकते दृष्टी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Next

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र कोरोनामुक्त झालेल्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर मात केल्यानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागतो. या कालावधीला 'लाँग कोविड' म्हटलं जातं. या कालावधीत अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या उद्भवतात. 

कोरोना विषाणूचा रुग्णाच्या डोळ्यांवर काय परिणाम होतो, त्यातून संबंधित व्यक्ती कशी बरी होऊ शकते, याबद्दल दिल्लीतील मणिपाल रुग्णालयाचे डॉ. वानुली वाजपेयी यांनी महत्त्वाची माहिती दिली. 'कोरोनाची लागण झाल्यावर किंवा कोरोनामुक्त झाल्यानंतर बऱ्याचदा डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही. काही रुग्णांमध्ये कंजेक्टिवायटिससारखी लक्षणं दिसून येतात. दीर्घ कालावधीसाठी डोळ्यांचा त्रास सहन करावा लागणाऱ्या रुग्णांची संख्या अतिशय कमी आहे,' असं वाजपेयींनी सांगितलं.

कोरोनाची लागण झाल्यानंतर कंजेक्टिवायटिसची लक्षणं दिसून येतात. औषधांच्या मदतीनं कंजेक्टिवायटिस लवकर बरादेखील होतो. मात्र काही रुग्णांच्या बाबतीत रेटिनावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे दृष्टीवर विपरित परिणाम होतो. अनेकदा रेटिनामधील धमन्यांमध्ये ब्लॉकेज होतं. त्यामुळे दृष्टी जाण्याचा धोका निर्माण होतो. अशा स्थितीत उपचारांची गरज भासते. मात्र यातूनही काही जण पूर्णपणे बरे होतात. तर काहींची दृष्टी जाते, अशी माहिती वाजपेयींनी दिली.
 

Web Title: CoronaVirus News decoding long covid can corona patients have vision loss after recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.